पुणे विभाग, मध्य रेल्वेच्यातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि जोडणी वाढवण्यासाठी हडपसर (पुणे) – जोधपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरु करण्यात येत आहे. या मार्गावर गाडी क्रमांक 01401 हडपसर (पुणे) – जोधपूर ही नवीन एक्सप्रेस गाडी पहिल्यांदाच दिनांक 03.05.2025 (शनिवार) ला धावेल. ही गाडी हडपसर (पुणे) येथून 17:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 14:00 वाजता जोधपूर येथे पोहोचेल. (Pune)
गाडी क्रमांक 01402 जोधपूर – हडपसर (पुणे) एकमार्ग टीओडी विशेष दिनांक 04.05.2025 (रविवार) ला धावेल. ही गाडी जोधपूर येथून 20:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 17:00 वाजता पुणे येथे पोहोचेल. (Pune)
(हेही वाचा – ATM Cash Withdrawal Rules : १ मे पासून बदलले एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क; आता किती पैसे द्यावे लागणार?)
हडपसर (पुणे) येथून निघणाऱ्या गाडीचे थांबे पुढील प्रमाणे असतील : चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवाडा, जवाई बांध, फालना, राणी, मारवाड, पाली मारवाड, लूणी. (Pune)
या एक्सप्रेस गाडीला 1 एसी 2-टियर, 4 एसी 3-टियर इकॉनॉमी, 5 स्लीपर क्लास, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 जनरेटर कार, 1 सामान आणि गार्ड यासाठी ब्रेक व्हॅन असणार आहे. (Pune)
आरक्षणाची सुविधा : गाडी क्रमांक 01401 साठी आरक्षण 02.05.2025 रोजी संध्याकाळी 16:00 वाजता सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरु होईल. अनारक्षित कोचचे तिकीट ‘UTS App’ वरून सुपरफास्ट मेल/एक्सप्रेससाठी लागू असलेल्या दरामध्ये काढता येईल. (Pune)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community