New Air Transport: आता करता येणार स्वस्तात विमान प्रवास, नवीन सेवा लवकरच सुरू; काय आहेत वैशिष्ट्ये ? जाणून घ्या…

256
New Air Transport: आता करता येणार स्वस्तात विमान प्रवास, नवीन सेवा लवकरच सुरू; काय आहेत वैशिष्ट्ये ? जाणून घ्या...
New Air Transport: आता करता येणार स्वस्तात विमान प्रवास, नवीन सेवा लवकरच सुरू; काय आहेत वैशिष्ट्ये ? जाणून घ्या...

भारतात लवकरच नवीन एअर लाईन्स प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज होईल. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाने मान्यता दिली आहे. सरकारकडून मंजुरी मिळालेली ही विमानसेवा २०२५मध्ये सुरू होणार असल्याची माहिती या विमान कंपनीकडून देण्यात आली आहे.

‘एअर केरळ’ असे या विमान कंपनीचे नाव असणार आहे. याविषयी माहिती देताना कंपनीने सांगितले की, या एअरलाइनच्या सुरुवातीला तीन एटीआर ७२-६०० विमाने वापरण्यात येणार आहेत. ही एअरलाइन देशातील टियर २ आणि टियर ३ सारख्या छोट्या शहरांना जोडणार आहे. एअर केरळने दुबईतील पत्रकार परिषदेत कंपनीला सरकारकडून एनओसी मिळाल्याची घोषणा केली आहे.

(हेही वाचा – Govt Scheme: शासकीय योजनांच्या प्रचारासाठी ५० हजार योजनादूत नियुक्त करणार; नेमकं काय करणार कार्य ? वाचा सविस्तर…)

उद्देश काय ?
एका अहवालानुसार, जेटफ्लाय एव्हिएशन या नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला हवाई वाहतूक सेवा चालवण्यास ३ वर्षांची मान्यता देण्यात आली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर आफी अहमद म्हणाले की, आमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे. या योजनेबाबत अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, पण आम्ही ते प्रत्यक्षात आणले आहेत. परवडणाऱ्या दरात विमानसेवा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. एअर केरळच्या या नवीन विमान कंपनीला दुबईतील दोन बड्या उद्योगपतींचा पाठिंबा मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना
एका अहवालाचा हवाला देत या विमान कंपनीची उड्डाणे पुढील वर्षापासून उड्डाणासाठी सज्ज होणार असल्याचे समोर आले आहे. लहान शहरांना कमी किमतीत हवाई सेवा पुरवण्याचे एअर केरळचे उद्दिष्ट आहे. एअर केरळ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापूर्वी प्रादेशिक उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे. एअर केरळच्या ताफ्यात २० विमाने आल्यानंतर ही एअरलाइन आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करू शकते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.