पुणेकरांनो… आता पुण्यातही धावणार निओ मेट्रो

83

पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण पुण्यातही लवकरच निओ मेट्रो धावणार आहे. पुण्यातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गावर निओ मेट्रो करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महामेट्रोने त्याचा सर्वंकष प्रकल्प आराखडा सादर केला आहे. त्यामुळे लवकर पुणे शहरात ४३.४८ किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार मार्गावर इलोव्हेटेड निओ मेट्रो धावताना दिसणार आहे. सार्वजनिक बसच्या तुलनेत तीन ते पाचपट अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता निओ मेट्रोमध्ये असते. याचे कोच विजेवर धावतात. तसेच ताशी ९० किलोमीटर वेगाने निओ मेट्रो धावू शकते.

निओ मेट्रोच्या प्रकल्पामध्ये ४५ स्थानकांचा समावेश असणार आहे. २०२३ डिसेंबरमध्ये सुरू झाल्यास २०२८-२०२९ मध्ये पूर्णत्वास जाऊ शकतो. त्यासाठी ४ हजार ९४० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. महामेट्रोतर्फे एचसीएमटीआर मार्गाचा हा डीपीआर महापालिकेला सादर केल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – गोंदियात 100 हून अधिक विद्यार्थ्यांचा ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने विद्यार्थी बेशुद्ध)

कसा असणार पुण्यातील मार्ग

निओ मेट्रोचा ४३.८४ किलोमीटरचा मार्ग बोपोडी येथून सुरू होणार आहे. आंबेडकर चौक स्टेशन हे पहिले स्थानक असणार आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेनापती बापट रस्ता, केळेवाडी, पौडफाटा, अलंकार पोलीस ठाणे, सिद्धी गार्डन, सेनादत्त पोलीस चौकी, सणस क्रीडांगण, लक्ष्मी नारायण चौक, सिटी प्राईड स्टेशन, मार्केट यार्ड, गंगाधाम चौक, बिबवेवाडी, लुल्लानगर, जांभूळकर चौक, फातिमानगर, घोरपडी, पिंगळे वस्ती, वडगाव शेरी, विमाननगर, विमानतळ, विश्रांतवाडी, डेक्कन महाविद्यालय, खडकी मेथडीस्ट चर्च आणि बोपोडी असा हा मार्ग असणार आहे. यामध्ये ४५ स्थानकांचा समावेश केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.