Odisha : गेल्या काही काळापासून सुरक्षा दलांनी जोरदार कारवाया करत नक्षलवाद्यांचे (Naxalites) कंबरडे मोडले आहे. असं असलं तरी नक्षलवादाचा पुरता बीमोड झालेला नाही. ओडिशातील राज्यातील राउरकेला येथे नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेला आव्हान दिले आहे. नक्षलवाद्यांनी स्फोटकांनी भरलेला एक ट्रॅक पळवला (Naxal Explosives truck hijacked) आहे. संबंधित ट्रक हा दीड टन स्फोटकांनी भरलेला होता. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार, ट्रकमध्ये प्राइम मेकच्या जिलेटिन स्टिक्सचे (Gelatin stick) सुमारे १५० पॅकेट होते. या घटनेनंतर झारखंड आणि ओडिशा पोलीस पुढील कारवाई करत आहेत. (Odisha)
(हेही वाचा – Amit Shah यांचे वीर सावरकर जयंतीनिमित्त अभिवादन; म्हणाले…)
भारतात नक्षलवाद्यांचे आव्हान सुरक्षा दल आणि सरकारसमोर कायम आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, ओडिशा येथील राऊरकेला येथून स्फोटकांनी भरलेला ट्रक पळवला आहे. हा ट्रक राउरकेला येथील केबलंग पोलीस स्टेशन परिसरातून बांको दगडखाणीकडे जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम नक्षलवाद्यांनी ट्रक थांबवला, त्याच्या चालकाला ओलीस ठेवले आणि जबरदस्तीने ट्रक सारंडाच्या घनदाट जंगलाकडे नेला.
भारतातील अनेक राज्यांमध्ये नक्षलवाद हा एक गंभीर आव्हान आहे. ज्यामध्ये विशेषतः छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील काही भागांचा समावेश आहे. अलिकडच्या वर्षांत, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर अनेक यशस्वी कारवाई केली आहे, ज्यामध्ये अनेक मोठे नक्षलवादी कमांडर मारले गेले आहेत किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
(हेही वाचा – Income Tax Return : आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत यंदा १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली; जूनमध्ये उघडणार नवीन पोर्टल)
अलीकडेच, २१ मे २०२५ रोजी, छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात झालेल्या एका मोठ्या चकमकीत, नक्षलवादी संघटना सीपीआय (Maoists) च्या सरचिटणीस, नंबला केशव राव उर्फ बसवराज याच्यावर एकूण १० कोटी रुपयांचे बक्षीस होते, पण त्याचा मृत्यू झाला. तसेच माडवी हिडमा सारखे इतर अनेक क्रूर नक्षलवादी अजूनही फरार आहेत आणि सुरक्षा दलांसाठी एक मोठे आव्हान आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community