Naxal Attack : तेलंगणातील बिजापूरमध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एक जवान जखमी  

59

Naxal Attack : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षलवाद संपवणार असल्याचा विडा उचलला आहे. अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद (Naxalism) पूर्णपणे संपवला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून,  तेलंगणा, बिजापूर आणि गडचिरोलीच्या सीमावर्ती परिसरात तीन राज्याच्या सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना घेरलं आहे. मात्र नक्षलवाद्यांविरोधातील या कारवाईत रविवारी 27 एप्रिलला करेगुट्टाच्या टेकड्यांमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात एक जवान जखमी झाला. अशी माहिती समोर आली आहे. (Naxal Attack)

(हेही वाचा – Pahalgam Attack Update: पाक लष्करप्रमुख असीम मुनीर नंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबही देश सोडून पळाले)

मिळलेल्या माहितीनुसार, या आईडी स्फोटात (Telangana ID explosion) जखमी झालेल्या जवानचे मुन्सिफ खान नाव आहे. मुन्सिफ खान यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी मुन्सिफ खान यांना तत्काळ घटनास्थळावरून विजापूरला हलवण्यात आले आहे. जखमी जवान मुन्सिफ खान यांना हेलिकॉप्टरनं करेगुट्टाच्या टेकड्यांवरून रेस्क्यू करण्यात आले आहे.

करेगुट्टाच्या जंगलात नक्षलवाद्यांना घेरलं
तीन राज्यातील सुरक्षा दलातील जवानांनी नक्षलवाद्यांना घेरलं आहे. गडचिरोली, बिजापूर आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात जवानांकडून नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे. रविवारी सकाळी करेगुट्टा टेकडीवर शोध मोहिमेदरम्यान एका जवानाचा पाय आयईडीवर पडला. ही घटना करेगुट्टा इथल्या जोला गावात घडली. या घटनेत जवानाच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र सुदैवानं या जवानाला बचावण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – Terrorist : पाकड्यांना भारताच्या सैनिकी कारवाईची भीती; बिळात जाऊन लपले दहशतवादी)

जवानांना पाहून पळाले नक्षलवादी
करेगुट्टा जंगलात शनिवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांच्या जवानांनी एका गुहेत घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पोबारा केला. नक्षलवादी थांबलेल्या गुहेत जवानांनी शोध घेतला असता, ते तिथून पळून गेल्याचं दिसून आलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करेगुट्टा आणि दुर्गमगुट्टाच्या जंगलात अनेक गुहा आहेत. या गुहेत नक्षलवादी लपल्याचा सुरक्षा दलाच्या जवानांना संशय आहे. जवान या परिसरात सतत शोध मोहीम राबवत आहेत.

टेकडीवरील गुहेवर ताबा
मोहिमेदरम्यान जवानांनी टेकडीवर असलेल्या एका गुहेवर ताबा मिळवला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, नक्षल कमांडर हिडमा (Naxal commander Hidma) या ठिकाणावरून पसार झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे ही मोहीम आणखी किती दिवस चालणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – CC Road : सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांसाठी दिवसाला रस्त्यावर धावतात ३७८ रेडीमिक्स मिक्सर)

केंद्र सरकार करणार नक्षलवादाचं समूळ उच्चाटन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षलवाद संपवणार असल्याचा विडा उचलला आहे. अमित शाह यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान नक्षलविरोधी कारवाई जोरात राबवत आहेत. सुरक्षा दलाच्या वाढत्या दबावानं अनेक नक्षलवादी चकमकीत मारले जात आहेत. मोठ्या संख्येनं नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.