Navratri Garba : गरबा कार्यक्रमात अन्य धर्मियांना प्रवेश नको; विश्व हिंदू परिषदेने केली ‘ही’ मागणी

गरबा हा फक्त डान्स आणि इव्हेंट नाही, तर देवीची भक्ती आणि श्रद्धा असल्याचे सांगत विहिंपने इतर धर्मियांना या ठिकाणी येण्यास विरोध केला आहे.

64
Navratri Garba : गरबा कार्यक्रमात अन्य धर्मियांना प्रवेश नको; विश्व हिंदू परिषदेने केली 'ही' मागणी
Navratri Garba : गरबा कार्यक्रमात अन्य धर्मियांना प्रवेश नको; विश्व हिंदू परिषदेने केली 'ही' मागणी

गरबा उत्सवात आयोजकांनी फक्त हिंदूंना प्रवेश द्यावा. (Navratri Garba) ओळख पटण्यासाठी गरबामध्ये येणाऱ्यांचे आधारकार्ड तपासण्यात यावे, अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे. गरबा फक्त नृत्य नाही, तो इव्हेंटही नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यानी प्रवेशच करू नये. तिथे फक्त हिंदूंनी प्रवेश करावा, असे मत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे. (Navratri Garba)

(हेही वाचा – Ladakh Avalanche : भारतीय सैन्य दलाच्या एका जवानाचा मृत्यू तर तीन बेपत्ता)

गेल्या काही वर्षांपासून गरबा सणात फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून केली जात आहे. गरब्याच्या कार्यक्रमात इतर धर्मिय लोक प्रवेश करतात आणि त्यामुळे लव्ह जिहाद प्रकरणे घडतात. या प्रकारांमध्ये आता दरवर्षी वाढ होत आहे. खासकरून गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गरबा आयोजकांकडून फक्त हिंदूंना या ठिकाणी प्रवेश देण्यात येतो. दारावर आधारकार्ड तपासण्यासाठी कार्यकर्ते नसल्यास विहिंपचे कार्यकर्ते उपलब्ध करून देऊ आणि पोलिसांनाही आम्ही बोलवू असे विश्व हिंदू परिषदेने सांगितले आहे. (Navratri Garba)

‘लव्ह जिहाद’च्या प्रकारांना निमंत्रण

गोविंद शेंडे पुढे म्हणाले की, गरबा उत्सवात श्रद्धा नसताना, देवीबद्दल भक्ती नसताना ही इतर धर्मीय तिथे प्रवेश करतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. त्यातूनच पुढे ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडतात. त्यामुळे गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांनी आधीच काळजी घ्यावी. विहिंपने गरबा उत्सव मंडळांना संपर्क साधून तशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. गरबा उत्सवात येणाऱ्यांचे आधारकार्ड तपासणे आणि प्रवेशद्वारावर तशी व्यवस्था करणे यासाठी मंडळांकडे कार्यकर्ते नसल्यास विहिंप आपले कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध करून देणार आहे. (Navratri Garba)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.