Navi Mumbai: तुर्भे येथे झोपडपट्टीला भीषण आग

136
Navi Mumbai: तुर्भे येथे झोपडपट्टीला भीषण आग
Navi Mumbai: तुर्भे येथे झोपडपट्टीला भीषण आग

नवी मुंबईतील (Navi Mumbai) तुर्भे येथे झोपडपट्टीत भीषण आग लागली. सेक्टर २६ मध्ये ग्रीन पार्क हॉटेलजवळ ही झोपडपट्टी असून अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आणखी गाड्याही घटनास्थळी पोहोचत असल्याची माहिती समजते. या आगीत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही तसेच आगीचे कारणही समजू शकलेले नाही.

(हेही वाचा – Sanatan Dharm : राज्यपाल बैस यांच्या हस्ते सनातन धर्माचे अमेरिकन अभ्यासक आनंद मॅथ्यू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न)

काही झोपड्यांमधले साहित्य जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे, मात्र झोपड्यांचे नुकसान झाले आहे. सिलिंडर लीक झाल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.