Navi Mumbai Rakshabandhan : वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या

सुरक्षेच्या दृष्टीने अनोखे रक्षाबंधन

66
Navi Mumbai Rakshabandhan : वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना विद्यांर्थ्यानी बांधल्या राख्या
Navi Mumbai Rakshabandhan : वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना विद्यांर्थ्यानी बांधल्या राख्या

वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत विविध स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र त्यानंतर सुद्धा अनेक जण या नियमाचे पालन करताना दिसत नाही. ही बाब लक्षात घेऊन तुर्भे (Navi Mumbai) येथील सामंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना सुरक्षेच्या दृष्टीने धडा देणाऱ्या लोकांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा (Rakshabandhan) सण साजरा केला.

तुर्भे येथील डॉक्टर सी व्ही सामंत विद्यालय आणि एपीएमसी वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळा असे अनेक माध्यमातून सांगितले जाते. तरीही वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडतात. वाहतूक पोलिसांनी या चालकांना धडा शिकवण्यासाठी या अनोख्या पद्धतीने रक्षा बंधन साजरे केले.

(हेही वाचा : Chandrayaan 3 : प्रज्ञान रोव्हरने पाठवला विक्रम लँडरचा पहिला फोटो, इस्रो म्हणाले Smile Please)

एपीएमसी बाजार पेठेतील मुख्य चौकात सामंत विद्यालयातील आरएसपीच्या विद्यार्थिनींनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना रोखून त्यांना राखी बांधली. तुमच्या घरी तुमची आई, ताई, बायको आणि मुलगी वाट पाहते आहे. त्यामुळे वाहने जपून चालवा, असा संदेश या विद्यार्थिनीने वाहन चालकांना दिला. नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकान्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.