Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; आता मेट्रोतून आरामदायी प्रवास

128
Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; आता मेट्रोतून आरामदायी प्रवास
Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; आता मेट्रोतून आरामदायी प्रवास

मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. (Navi Mumbai Metro) नागरिकांसाठी तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अनेक वर्षांपासून नवी मुंबईचे नागरीक मेट्रो सेवा चालू करण्याची प्रतीक्षा करत आहेत.

सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या मार्ग क्र. 1 वर शुक्रवारी म्हणजेच 17 नोव्हेंबर 2023 पासून औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. मेट्रोमुळे नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे. सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा परिसराला मेट्रोद्वारे कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. (Navi Mumbai Metro)

(हेही वाचा – Mumbai Water Cut : पुढील सोमवारपासून २ डिसेंबरपर्यंत संपूर्ण मुंबईत पाणीकपात)

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग विकसित होत आहेत. सिडकोतर्फे प्रथम बेलापूर ते पेंधर या 11.10 किमी लांबीच्या मार्ग क्र. 1 चे काम हाती घेण्यात आले होते. सदर मार्गावर एकूण 11 स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे डेपो आहे. मार्ग क्र. 1 च्या कामासाठी सिडकोतर्फे महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली आहे. (Navi Mumbai Metro)

मार्ग क्र. १ वर धावणाऱ्या मेट्रोच्या ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, ईमर्जन्सी ब्रेक इ. चाचण्या यशस्वीरित्या पार पाडण्यात आल्या.  त्याबाबतचे प्रमाणपत्रही संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले. सीएमआरएस (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) यांच्यातर्फे करण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वीरीत्या पार पडली. प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरता सीएमआरएस यांचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबर 2023 पासून सदर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

(हेही वाचा – Supreme Court : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची न्यायमूर्तींसाठी आचारसंहिता  )

मेट्रोचे वेळापत्रक आणि तिकीट

ही मेट्रो सेवा 17 नोव्हेंबर 2023 रोजी पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान दुपारी 3.00 वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री  10 वाजता असणार आहे. 18 नोव्हेंबर 2023 पासून पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता धावणार आहे. या मार्गावर दर 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकीटाचे दर हे 0 ते 2 किमीच्या टप्प्याकरिता 10 रुपये, 2 ते 4 किमीकरता 15 रुपये, 4 ते 6 किमीकरता 20 रुपये, 6 ते 8 किमीकरता 25 रुपये, 8 ते 10 किमीकरता 30 आणि 10 किमीपुढील अंतराकरता 40 रुपये असा तिकीट दर असणार आहे. (Navi Mumbai Metro)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.