Naval Officers In Qatar : 8 माजी नौदल अधिकार्‍यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानच्या ‘या’ मित्रदेशाला आवाहन

कतारशी बोलणी करण्यासाठी भारत अनेक स्तरांवर राजनैतिक प्रयत्न करत आहे. कतारच्या शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्या कुटुंबाशी तुर्कीचे खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे सरकारने आता तुर्कीला मदतीसाठी आवाहन केले आहे.

110
Naval Officers In Qatar : 8 माजी नौदल अधिकार्‍यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानच्या 'या' मित्रदेशाला आवाहन
Naval Officers In Qatar : 8 माजी नौदल अधिकार्‍यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानच्या 'या' मित्रदेशाला आवाहन

कतार देशामध्ये भारताचे ८ निवृत्त नौदल अधिकारी आणि कर्मचारी यांना हेरगिरीच्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Naval Officers In Qatar) त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात तुर्कीये भारताला साहाय्य करू शकतो का ? याची चाचपणी करण्यात येत आहे. तुर्कीये पाकिस्तानचा जवळचा मित्र असून त्याचे कतारशी चांगले संबंध आहेत. हे भारतासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

(हेही वाचा – Sawantwadi Station : मांडवी एक्स्प्रेसच्या चाकांतून धूर आल्याने भीतीचे सावट, प्रवाशांची पळापळ)

कतारशी बोलणी करण्यासाठी भारत अनेक स्तरांवर राजनैतिक प्रयत्न करत आहे. त्यापैकी एक म्हणजे मदत मिळवणे. असे म्हटले जात आहे की, कतारच्या शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्या कुटुंबाशी तुर्कीचे खूप चांगले संबंध आहेत. अशा परिस्थितीत भारत सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांनी तुर्कीला मध्यस्थ बनवण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे सरकारने आता तुर्कीला मदतीसाठी आवाहन केले आहे. (Naval Officers In Qatar)

भारत या संदर्भात अमेरिकेशीही चर्चा करत आहे. अमेरिकेची कतारच्या प्रशासनावर मजबूत पकड असल्याचे म्हटले जात आहे. जर कोणतेही राजनैतिक प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हे प्रकरण हाताळतील. पंतप्रधान मोदी कतारचे शेख तमीम बिन हमाद यांच्याशी या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे.

भारत आणि कतार पारंपरिक मित्र

भारत आणि कतार यांच्यात पारंपरिकरित्या चांगले द्विपक्षीय संबंध आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे 15 अब्ज डॉलर्स इतका आहे आणि तो वाढत आहे. भारत कतारकडून एल.एन.जी. आणि एल.पी.जी. खरेदी करतो, तर कतार भारतातून रसायने, लोह, तांबे आणि खाद्यपदार्थ खरेदी करतो. कतार भारताला 42 टक्के एलएनजी पुरवतो. भारत आणि कतार यांच्यात 2008 मध्ये संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. कतारच्या लष्कराला भारताकडून राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि भारतीय लष्करी अकादमीतही प्रशिक्षण मिळते. त्याच वेळी, कतारचे नौदल देखील नियमितपणे सरावात सहभागी होते. कतारमध्ये सात लाख भारतीय राहतात आणि काम करतात.  (Naval Officers In Qatar)

हेही पहा – 

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.