आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात (Nashik Kumbh Mela 2027) साधूग्रामसाठी एक हजार एकर जागा अधिग्रहित करणार असून येत्या दोन वर्षात सर्व जीर्ण मंदिरांचा कायापालट करण्यात येणार असून “रामकाळ पथ” अंतर्गत रामकुंड ते राममंदिर (Ramkund to Ram Mandir) या परिसरातील विकास कामांसाठी शंभर कोटीचा निधी खर्च करणार असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी केले. आयुक्त खत्री यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे बोलत होत्या.
डॉ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यानमालेत सिंहस्थ कुंभमेळा त्रंबकेश्वर (Trimbakeshwar), नाशिक २०२७ – २०२८ या विषयावर आयोजित परिसंवादात खत्री बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, महंत भक्तीचरणदास महाराज, व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलखेकर,सतीश शुक्ल,आदी उपस्थित होते.
आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यावर मार्गदर्शन करताना सांगितले की नाशिकच्या प्रमुख रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याचे काम पुढील दोन वर्षात करण्यात येणार आहे नाशिकच्या गंगाघाट परिसरातील पुरातन मंदिरे तसेच त्र्यंबकेश्वर मधील पुरातन मंदिरांचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी शासनाजवळ उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रयागराजचा कुंभमेळ्याचा (prayagraj kumbh mela 2025) अनुभव समोर ठेवून एकूण लोकसंख्येचा आढावा घेऊन जास्तीत जास्त गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गेडाम यावेळी सांगितले.
“इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर डेटा विश्लेषण” या अंतर्गत नाशिक ते त्रंबकेश्वर यामधील कोणत्या चौकात किती गर्दी झाली आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वतंत्र नेटवर्क या प्रणालीद्वारे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी प्रोजेक्टर द्वारे गेडाम यांनी सांगितले. नाशिक महानगर विकास प्राधिकरण या अंतर्गत देखील दुसरे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी परिसंवादातून सांगितले. सिंहस्थ कुंभमेळा परिसंवादानंतर कलानंद कथक नृत्य संस्था प्रस्तुत भक्तीधारा हा कार्यक्रम सादर झाला. व्याख्यानमालेच्या प्रारंभी स्व. वसंतराव पवार यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली. आयुक्त प्रवीण गेडाम यांचा सत्कार प्रणव पवार यांनी केला तसेच मनीषा खत्री यांचा सत्कार व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्ष संगीता बाफना यांनी केला. (Nashik Kumbh Mela 2027)
Join Our WhatsApp Community