नाशिक अपघातः ड्रायव्हरच्या लोभाने घेतले प्रवाशांचे प्राण, पोलिसांच्या अहवालात खुलासा

85

8 ऑक्टोबर रोजी पहाटे औरंगाबाद महामार्गावर झालेल्या बस अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला हातो. या अपघाताबाबतचा अहवाल आता पोलिसांनी तयार केला आहे. या अहवालात बसमध्ये चालकांसह साठ लोक प्रवास करत असल्याचे पोलिसांच्या अहवालात समोर आले आहे. त्यामुळे बसचालकाच्या मोहापायी बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

13 प्रवाशांचा मृत्यू

शनिवार 8 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथून मुंबईला येणा-या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसची आणि आशयर ट्रकची कैलास नगर चौफुली येथे जोरदार धडक झाली होती. या धडकेनंतर संपूर्ण बसला आग लागली होती. त्यामुळे यामध्ये 13 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर ट्रॅव्हल्सकडून केल्या जाणा-या प्रवासी वाहतुकीसह रस्ता सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणेची मदत अशा सर्वच बांबीवर प्रश्नचिन्ह उभे झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाबाबत हळहळ व्यक्त करुन अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले होते.

अहवालात आहे काय?

चौकशीनंतर पोलिसांनी आपला अहवाल सादर केला आहे. यामध्ये बसमध्ये आसन क्षमतेच्या दुप्पट माणसं भरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 60 प्रवासी होते पण बसची आसन क्षमता ही केवळ 30 प्रवाशांची होती. अपघातात मृत झालेले दहा प्रवासी हे आगाऊ बुकिंग न करता प्रवासादरम्यान बसमध्ये भरण्यात आली होती, असे अहवालात म्हटले आहे. बसचालकाने आपल्या आर्थिक लाभापायी वाटेत 30 प्रवाशांचा भरणा केला होता. बसच्या पॅसेजमध्ये बसवलेल्या प्रवाशांना बसवण्यात आले होते त्यामुळे आग लागल्यानंतर त्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही, परिणामी त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.