नाशिक : सप्तश्रृंगी गड घाटात बसचा अपघात; एकाचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी

204
नाशिक : सप्तश्रृंगी गड घाटात बसचा अपघात; एकाचा मृत्यू, नाशिक : सप्तश्रृंगी गड घाटात बसचा अपघात; एकाचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी प्रवासी जखमी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशातच नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर एक भीषण अपघात झाला आहे. देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची बस थेट दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ही बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फूट खोल दरीत कोसळली.

अशातच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या अपघाताची माहिती घेत घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू झालं आहे. या बसचा सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी बसचा अपघात झाला. सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Epidemic : साथीच्या रुग्णांच्या संख्येत ‘या’ कारणामुळे होतेय वाढ..)

अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल (११ जुलै) सकाळी ८:३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. मात्र नंतर या बसचा अपघात झाला. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे.

अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही : पालकमंत्री दादा भुसे

पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जी माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील १८ प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉईंटजवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला. अशी प्राथमिक माहिती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तशृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.