Nala Safai : नाल्यातील गाळ काढण्यास का होतो विलंब, जाणून घ्या हे कारण

366
Nala Safai : नाल्यातील गाळ काढण्यास का होतो विलंब, जाणून घ्या हे कारण
Nala Safai : नाल्यातील गाळ काढण्यास का होतो विलंब, जाणून घ्या हे कारण
  • मुंबई (विशेष प्रतिनिधी)

यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे नालेसफाईतील (Nala Safai) गाळच वाहून गेल्याचे दिसून आले आहे. परंतु नाल्यातील काढलेला गाळ वाहून नेण्यात महापालिकेने (BMC) तयार केलेले ऍप आणि गाळाची विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडवर (Dumping ground) पावसामुळे तयार झालेल्या दलदलची कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. ऍपवरील प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ अपलोड आणि त्यांची नोंदणी करण्यासाठी प्रत्येक ट्रकला किमान १५ ते २० मिनिटांचा अवधी जात असल्याने रांगेतील प्रत्येक डम्परचा नंबर येण्यास किमान दोन ते अडीच तासांचा अवधी लागत आहे. त्यामुळे एआय ऍपवरील नोंदणीची प्रक्रिया आणि डम्पिंग ग्राऊंडवरील पाणी साचून दलदल निर्माण झाल्याने वेळीच डम्पर येत नसल्याने गाळ उचण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत आतापर्यंत सर्व छोटे,मोठे नाल्यांसह मिठी नदीच्या (Mithi River) सफाईचे शुक्रवारपर्यंत ६७.४० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्य मोठ्या नाल्याची ८५ टक्के तर छोट्या नाल्यांची ६५ टक्केपर्यंत सफाई पूर्ण झाली. मिठी नदीची (Mithi River) सफाई सुमारे ५१ टक्के एवढी झाली आहे. परंतु मागील पाच ते सहा दिवसांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यातून काढून ठेवलेला गाळ या पावसात वाहून गेला आहे.यामध्ये कंत्राटदारांना आता पुन्हा सफाईचे काम करावे लागणार आहे.

(हेही वाचा – Jharkhand : “पप्पूला गोळी मारली अन्…”; जाणून घ्या नेमकं काय घडलं)

मिळालेल्या माहितीनुसार, नाल्यासह मिठी नदीतील (Mithi River) गाळ एका ठिकाणी सुरक्षितपणे बाहेर काढून सुकवला जातो आणि एकत्रपणे डंपरमध्ये भरुन डम्पिंग ग्राऊंडमध्ये (Dumping ground) त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु हा काढून ठेवलेला गाळ डंपरमध्ये भरताना त्याची महापालिकेच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करताना लागणारा अवधी या प्रत्यक्षाता डंपरमध्ये गाळ भरण्यापासून वजन काट्यावरील वजन आणि त्यानंतर डम्पिंग ग्राऊंडवर त्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व्हरच्या माध्यमातून ऍपवर नोंदणी करण्यास बराच अवधी लागतो. त्यामुळे एका मागोमाग दहा ते बारा डंपर असल्यास शेवटच्या डम्परचा नंबर येईपर्यंत त्याला दोन ते अडीच तासांचा वेळ लागतो. त्यामुळे गाळाची विल्हेवाट लावण्यास यंदा फारच वेळ लागत आहे. त्यामुळे नाल्यातील गाळाची सफाईचे (Nala Safai) काम ८० टक्यापर्यंतची झाली असले तरी प्रत्यक्षात गाळाच्या वजनावर गाळ मोजला जात असल्याने प्रत्यक्षात सफाईची टक्केवारी कमी दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.

त्यातच पावसामुळे डम्पिंग ग्राऊंडवरच्या जागेवर पावसाचे पाणी साचले गेले आणि त्याठिकाणी दलदल निर्माण झाल्याने आतमध्ये गाळ वाहून नेणारे डंपर जात नाही. त्यामुळे गाळाची विल्हेवाट लावून डंपर पुन्हा नाल्याची तथा नदीच्या ठिकाणी पोहोचण्यास बरेच तास जात असल्याने गाळाची विल्हेवाट लावण्यास बराच वेळ जात आहे. त्याचा परिणाम गाळ वाहून नेण्यावर होत असून नाल्यातून काढलेला गाळ या पावसामुळे पाण्यात वाहून गेल्याचेही बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.