Chandivali नाहर जंगल तब्बल ४१ हजार झाडांनी बहरले

Chandivali नाहर जंगल, तब्बल ४१ हजार झाडांनी बहरले

60
Chandivali नाहर जंगल तब्बल ४१ हजार झाडांनी बहरले
Chandivali नाहर जंगल तब्बल ४१ हजार झाडांनी बहरले

मुंबई शहरात सुमारे ६ लाख झाडांची यशस्वीपणे लागवड मियावाकी पद्धतीने करण्यात आल्यानंतर या शहरी जंगलाचा विस्तार आता आणखी १६,००० चौ. मीटरने वाढला गेला आहे. या ठिकाणी तब्बल ४१,२०७ झाडे लावण्यात आली आहेत. या वृक्षारोपणामध्ये जांभूळ, अर्जुन, पळस, मोह, आंबा, पिंपळ यांसारख्या देशी जातींसह एकूण ७९ देशी प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. मियावाकी पद्धतीने नाहर अरण्य विकसित झाले असून चांदिवलीत आता प्रत्यक्ष शहरी जंगलाचे दर्शन घडत आहे. (Chandivali)

हेही वाचा-Pahalgam Terror Attack : पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काय घडलं ? किरेन रिजिजू म्हणाले …

वसुंधरा दिनानिमित्त मुंबईत शाश्वत शहरी वनस्पती संवर्धन व पर्यावरण संरक्षणावर आधारित एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये नामांकित कॉर्पोरेट उद्यानतज्ज्ञ, प्रमाणित अर्बोरिस्ट आणि मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. हा उपक्रम चांदिवली येथील “नाहर अमृत शक्ति गार्डन” येथे पार पडला, जिथे मियावाकी पद्धतीने एक आदर्श शहरी जंगल विकसित करण्यात आले आहे. (Chandivali)

हा कार्यक्रम हा मुंबई महानगरपालिका आणि माननीय सुखराजजी नाहर (अध्यक्ष, नाहर बिल्डर्स लिमिटेड) यांच्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे पर्यावरणाविषयी जनजागृती करणे, अधिकाधिक मियावाकी अरण्यांची निर्मिती करणे आणि शाश्वततेच्या दिशेने पावले उचलणे. (Chandivali)

हेही वाचा- फलटन रोड येथील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास कुणी अडवला? जागा रिकामी करून द्यायला BMC कडून होतो विलंब

मुंबई शहरात सुमारे ६ लाख झाडांची यशस्वीपणे लागवड मियावाकी पद्धतीने करण्यात आली असून, त्यामुळे शहरी प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे आणि पर्यावरणीय आरोग्यात मोठी सुधारणा झाली आहे. हे यश हवामान अनुकूलता वाढविण्यास आणि पर्यावरणीय समृद्धी साधण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.मियावाकी पद्धतीचा मुख्य उद्देश म्हणजे वायू गुणवत्ता सुधारणे, उष्णता कमी करणे आणि ध्वनी प्रदूषण शोषणे. या पद्धतीने तयार झालेले जंगल शहरी हिरवाई संवर्धनाचे एक आदर्श उदाहरण ठरले आहे. (Chandivali)

हेही वाचा- राज्य कामगार विमा योजनेंतर्गत Hospitals होणार अत्याधुनिक

महापालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी मियावाकी जंगल यशस्वी होण्यामागील बारकावे सांगितले, आणि शहराच्या पर्यावरण आरोग्य सुधारण्यात शहरी वनसंवर्धन व अर्बोरिकल्चर तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. (Chandivali)

या कार्यक्रमात प्रमुख उद्यानतज्ज्ञ आणि विशेषज्ञ सहभागी झाले होते – रॉबर्ट फर्नांडिस (के. रहेजा कॉर्पोरेशन), प्रविण मोरे (हिरानंदानी कन्स्ट्रक्शन), डॉ. असीम गोकर्ण (आर्किटेक्ट), ऊत्पला आहिरे (रिलायन्स), आरती आरती बांबोरे (गोदरेज) निवृत्ति हेगडे (गोदरेज)आणि सचिन तावडे (मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.). त्यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. मुंबईतील हिरवळींचे संवर्धन व वाढीव जैवविविधतेसाठी त्यांनी विविध शहरी उपाययोजना सुचविल्या आणि लहान प्रकल्पांमधूनही मोठा शाश्वत बदल घडवून आणता येतो, हे अधोरेखित केले. (Chandivali)

हेही वाचा- Indus Waters Treaty थांबवल्याने भारताला काय होणार फायदा?

अर्बोरिकल्चरची गरज व त्याचे हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन व पर्यावरणासंबंधी महत्त्व यावर सविस्तर सादरीकरणप्रमाणित अर्बोरिस्ट विवेक राणे यांनी दिले. वृक्षांचे मूल्यमापन नागरिकांच्या आरोग्यावर कसा सकारात्मक परिणाम करतो आणि शहरी जीवनमान सुधारण्यासाठी याचे महत्त्व किती आहे हे त्यांनी पटवून सांगितले. (Chandivali)

कार्यक्रमादरम्यान मियावाकी जंगलातील ट्रेल (फेरी) आयोजित करण्यात आली होती. या फेरीत मियावाकी पद्धतीने विकसित केलेल्या नाहर अरण्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवण्यात आले व त्यातून मिळालेल्या परिणामकारक फळांबाबत माहिती देण्यात आली. (Chandivali)

हेही वाचा- पहलगाम हल्ल्यावरून Nitesh Rane यांचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, ‘लेच्यापेचा कॉंग्रेस सरकार नाही’ 

वसुंधरा दिनानिमित्त झालेला हा उपक्रम निसर्गाच्या सन्मानासाठी होता, पण त्यासोबतच मुंबईतील हरित क्षेत्रांचे जतन व वाढ यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा होता. भविष्यात अधिक शाश्वत आणि पर्यावरणाभिमुख शहरी उपक्रम घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाने एक सकारात्मक संदेश दिला. (Chandivali)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.