Myanmar plane crashed : भारतीय हद्दीत कोसळले म्यानमारचे विमान; अपघातात २ गंभीर जखमी

पश्चिम म्यानमारमधील अरकान आर्मी बंडखोरांनी ७ दिवसांपूर्वी दावा केला होता की त्यांनी एका जिल्ह्यावर कब्जा केला आहे. ते भारतीय सीमेजवळ आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून म्यानमारच्या लष्कराविरुद्ध वांशिक बंडखोरांचे हल्ले सातत्याने वाढत आहेत.

139
Myanmar plane crashed : भारतीय हद्दीत कोसळले म्यानमारचे विमान; अपघातात २ गंभीर जखमी

म्यानमारच्या बंडखोरांच्या हल्ल्यातून बचावलेल्या सैनिकांना परत नेण्यासाठी आलेले विमान (Myanmar plane crashed) आज, मंगळवारी (२३ जानेवारी) मिझोराममध्ये कोसळले. मिझोराममधील लेंगपुई विमानतळावर या विमानाला अपघात झाला. उतरताना हे विमान धावपट्टीवरून घसरून खड्ड्यात पडले. त्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले असून १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

(हेही वाचा – Kuno National Park : कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याच्या ३ पिलांचा जन्म)

बंडखोर आणि म्यानमार लष्करामध्ये चकमक –

म्यानमारमध्ये बंडखोर आणि म्यानमार लष्करामध्ये (Myanmar plane crashed) चकमक सुरू आहे. बंडखोरांचा धुव्वा उडाला तेव्हा सुमारे १०० सैनिक तेथून भारतीय सीमेवरील मिझोरामच्या लवांगतलाई जिल्ह्यात पळून आले होते. त्यांना परत नेण्यासाठी म्यानमारचे हे विमान आले होते. म्यानमारमधील गृहयुद्धात अरकान आर्मीच्या बंडखोरांनी सैन्य छावण्यांवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी म्यानमारचे शेकडो सैनिक सीमा ओलांडून भारतात दाखल झाले होते. या सैनिकांनी मिझोरामच्या लवांगतलाई जिल्ह्यात आश्रय घेतला होता. (Myanmar plane crashed)

(हेही वाचा – Australian Open 2024 : युवा टॉमेक बर्केटाची ताशी २३३ किमी वेगाने सर्व्हिस)

अरकान आर्मीचा चीन शहरावर ताबा –

पश्चिम म्यानमारमधील अरकान आर्मी बंडखोरांनी ७ दिवसांपूर्वी दावा केला (Myanmar plane crashed) होता की त्यांनी एका जिल्ह्यावर कब्जा केला आहे. ते भारतीय सीमेजवळ आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून म्यानमारच्या लष्कराविरुद्ध वांशिक बंडखोरांचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. अरकान आर्मीने चिन राज्यातील पलेटवा शहर ताब्यात घेतले असून संपूर्ण शहरात लष्कराची एकही छावणी उरलेली नाही. (Myanmar plane crashed)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.