My Lord in Supreme Court : जेव्हा न्यायमूर्ती वकिलांना स्वत:चा अर्धा पगार देऊ करतात…

136

सर्वोच्च न्यायालयातील वकील त्यांची भाषणे देताना न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युवर लॉर्डशिप’ असे संबोधतात. (My Lord in Supreme Court) तथापि 2006 मध्ये ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने एक विशेष ठराव मंजूर केला. त्यामध्ये एक विशेष निर्णय घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत बार कौन्सिलने घोषित केले की, यापुढे कोणताही वकील न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युअर लॉर्डशिप’ने संबोधित करणार नाही. काही वकील अजूनही हा शब्द वापरतात ही वेगळी बाब आहे.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयात एक रंजक घटना घडली. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्यासमोर सुनावणी चालू असतांना एक वकील त्यांना वारंवार ‘माय लॉर्ड’ असे संबोधत होता. हे ऐकून न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह यांनी एक विशेष टिप्पणी केली. (My Lord in Supreme Court)

(हेही वाचा – Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकले सहा जण)

… तर अर्धा पगार देईन

न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह यांनी वकिलाला सांगितले, “तुम्ही किती वेळा ‘माय लॉर्ड्स’ म्हणाल ?  तुम्ही हा शब्द वापरायचे टाळले, तर मी माझा अर्धा पगार देईन. तुम्ही या शब्दांऐवजी ‘सर’, असे का बोलत नाही ? जर तुम्ही आता ‘माय लॉर्ड’ म्हणणे टाळले नाही, तर तुम्ही किती वेळा ‘माय लॉर्ड’, ‘युवर लॉर्डशिप’ म्हटले आहे, हे मी मोजायला सुरुवात करीन.” (My Lord in Supreme Court)

सामान्यतः युक्तिवाद किंवा नियमित सुनावणीदरम्यान वकील न्यायमूर्तींना उद्देशून ‘माय लॉर्ड’, ‘युवर लॉर्डशिप’, असे शब्द वापरतात. ‘माय लॉर्ड’, ‘युवर लॉर्डशिप’ असे म्हणणे ही ब्रिटीशकालिन पद्धत आहे. वकिलांनी न्यायमूर्तींना ‘माय लॉर्ड’, ‘युवर लॉर्डशिप’ असे म्हणणे, हे वसाहतवादी राजवटीचे प्रतीक आहे. हे शब्द वापरले जाऊ नयेत, असे काही वकिलांचेच म्हणणे होते. ब्रिटिश सरकारच्या काळात न्यायालयातील वकील या शब्दांद्वारे न्यायाधिशांसमोर आपला मुद्दा मांडायचे. स्वातंत्र्यानंतरही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या मोठ्या न्यायालयांमध्ये ही पद्धत कायम ठेवली गेली.

या शब्दांच्या वापरावर 2006 मध्ये वकिलांच्या सर्वांत मोठ्या संस्थेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने एक विशेष ठराव मंजूर करून ‘यापुढे कोणताही वकील न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युअर लॉर्डशिप’ने संबोधित करणार नाही’, असा तो ठराव होता. प्रत्यक्षात मात्र वकील स्वतः हे शब्द वापरण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. (My Lord in Supreme Court)

यासंदर्भात काही वकिलांचे म्हणणे आहे की, ही प्रत्यक्षात एक सवय आहे आणि त्याला सामान्य कामातून बाहेर काढणे थोडे कठीण आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह यांच्या वक्तव्यानंतर ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युअर लॉर्डशिप’ यांसारख्या शब्दांचा वापर कमी करतील, अशी आशा करण्यास हरकत नाही. (My Lord in Supreme Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.