दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला आहे. (Shiva Temple Vandalised West Bengal) मिळालेल्या माहितीनुसार, शिव मंदिराच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नाला हिंदूंनी विरोध केला, त्यानंतर मुसलमानांनी हिंसाचार घडवला. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बज-बज परिसरात, रवींद्र नगर पोलिस स्टेशनजवळ महेशतला (Maheshtala) येथे एका प्राचीन शिव मंदिराच्या आवारातील तळीमध्ये माती टाकून हळूहळू अतिक्रमण केले जात असल्याचे हिंदू बांधवांच्या निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.
(हेही वाचा – ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ ; नाना पटोलेंच्या Operation Sindoor बाबतच्या वादग्रस्त विधानाचा भाजपाने घेतला समाचार !)
मंगळवार, १० जून या दिवशी बज-बज परिसरात काही मुसलमानांनी शिव मंदिराच्या जमिनीवर फळांची दुकाने लावण्याचा प्रयत्न केला. याला हिंदूंनी विरोध केला. त्यानंतर मुसलमानांनी मंदिरात तोडफोड केली आणि त्यावर दगड व विटा फेकल्या.
जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मुसलमानांनी त्यांच्यावरही हल्ला केला. पोलिसांवर दगड आणि विटांनी आक्रमण करण्यात आले. ज्यात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले, ज्यात एका महिला कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. जवळच्या इमारतींच्या छतावरूनही पोलिसांवर दगड फेकण्यात आले.
जमावाने केवळ मंदिरावरच नाही, तर पवित्र तुळशी वृंदावन, आजूबाजूची हिंदू दुकाने आणि घरे यांवरही हल्ला केला. परिसरात अनेक दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलला आग लावण्यात आली आणि अनेक पोलिस वाहनांचेही नुकसान झाले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर
सुरुवातीला पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे ते त्वरित कारवाई करू शकले नाहीत. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पोलिसांना काही काळ मागे हटावे लागले. संपूर्ण परिसर दगड, विटा आणि तुटलेल्या वस्तूंनी भरून गेला होता.
भाजप नेते सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी म्हटले आहे की, ही घटना रवींद्र नगर पोलिस स्टेशनपासून (Ravindra Nagar Police Station) थोड्याच अंतरावर घडली, परंतु पोलिसांनी जमावाला थांबवण्यासाठी काहीही केले नाही. त्यांनी ‘X’या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात मुसलमान गोंधळ करताना दिसत आहेत.
Diamond Harbour Model
The disgraceful incident of vandalism at the Shiva Temple in Ward No. 7, Maheshtala, under Metiabruz Assembly constituency, near Rabindra Nagar Police Station is simply unacceptable.
Miscreants had illegally encroached upon Temple Committee land, set up… pic.twitter.com/QUBSQxKYhK— Suvendu Adhikari (@SuvenduWB) June 11, 2025
सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले की, संपूर्ण घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडली, परंतु ते दंगलखोरांना रोखू शकले नाहीत. व्हिडिओमध्ये एक स्थानिक हिंदू व्यक्तीने सांगितले की, जमावाने त्यांना मंदिर बंद करण्यास सांगितले, परंतु त्यांनी मंदिर खुलेच ठेवण्याचा निर्णय घेतला.
या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. (Shiva Temple Vandalised West Bengal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community