Muslim : धर्मांध मुसलमान चक्क गोमांस घालून समोसे विकायचा

आरोपी गोमांस भरलेले समोसे चार वर्षांपासून विकत असल्याची माहिती समोर आली आहे.

166

गेल्या काही दिवसांत दक्षिण गुजरातमधील परिसरात गोहत्या आणि मांस विकण्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशातच मंगरूळ येथील हत्येतील फरार आरोपी इस्माइल याच्याकडून गोमांस भरलेले समोसे मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आले. नवसारीच्या दाभेल गावातून अशीच एक ताजी घटना समोर आली आहे, ज्यात ट्रकमध्ये गोमांस भरलेले समोसे विकण्यासाठी नेले जात होते, त्यामध्ये एका व्यक्तीला नुकतीच अटक करण्यात आली आहे.

नवसारीतील जलालपूर तालुक्यातील दाभेल गावात गोमांसाची विक्री होत असल्याची माहिती मरोली पोलीस आणि गोरक्षकांना मिळाली होती. याच कारणामुळे मरोली पोलिसांच्या जवानांनी दाभेल गावाकडे ‘ए वन चिकन बिर्याणी’ या नावाच्या ट्रकमधील मसाल्यात मिसळलेल्या मांसाचा नमुना ताब्यात घेतला असता ते गोमांस असल्याचे समोर आले. पोलिसांनी ताबडतोब अहमद मुहम्मद सूज या आरोपीला ताब्यात घेतले, तर दुसऱ्याला फरार घोषित केले. या तपासात आरोपी गोमांस भरलेले समोसे चार वर्षांपासून विकत असल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा Aurangzeb : औरंगजेबाचे फोटो अचानक झळकण्याला राजकीय वास; आमदार सत्यजीत तांबे)

विशेष म्हणजे, या आधी आरोपी अहमद मोहम्मद सूज पोलिसांना येताना पाहून ट्रकमधील समोसे तलावात फेकायचा. त्याने हे कृत्य एकापेक्षा जास्त वेळा केले. मात्र यावेळी पोलीस सतर्क झाले आणि गोमांसाने भरलेले समोसे तलावात टाकण्यापूर्वीच त्याला अटक केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.