Muslim Dhaba : कावड मार्गावर होता पंडित जी वैष्णो ढाबा; सत्य समोर येताच मुसलमान मालक फरार 

Muslim Dhaba : या प्रकरणी नवी मंडी पोलिसांनी सनव्वर आणि पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

204

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे ‘पंडित जी वैष्णो ढाबा’ नावाचा मुस्लिम मालकांचा ढाबा (Muslim Dhaba) आता बंद झाला आहे. हिंदू संघटनांनी काही दिवसांपूर्वी या ढाब्याचा पर्दाफाश केला होता. सनव्वर, आदिल, जुबैर यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा – Bombay High Court चे आता ‘थेट प्रक्षेपण’; सोमवारपासून ऑनलाईन कामकाज पाहता येणार!)

हिंदू नावाने सुरु होता Muslim Dhaba 

ढाब्याचा पर्दाफाश झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ढाबा मालक सनव्वरने ढाब्याचा व्यवस्थापक धर्मेंद्र भारद्वाज याला मारहाण केली होती. व्यवस्थापकानेच ही माहिती बाहेर दिली, असे त्याचे म्हणणे होते. या प्रकरणी नवी मंडी पोलिसांनी सनव्वर आणि पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी धाबा गाठले असता, ढाबा बंद असून सर्व आरोपी फरार झाल्याचे समोर आले.

योग साधना आश्रम बघरा येथील स्वामी यशवीर महाराज आणि त्यांच्या पथकाने कावंड यात्रा (Kanwar Yatra) मार्गावर तपासणी करत असताना दिल्ली-डेहराडून महामार्गावरील (Delhi – Dehradun Expressway) ‘पंडित जी वैष्णो ढाबा’ गाठले. येथे चौकशी केल्यावर त्यांना समजले की ढाब्याच्या मालकाचे नाव सनव्वर आहे, तर बाहेरच्या बोर्डवर हिंदू नाव लिहिले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ढाब्यावर पोहोचले असता, ढाबा बंद होता आणि आरोपी गायब होते. नवी मंडी कोतवालीचे प्रभारी निरीक्षक दिनेश चंद्र बघेल यांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना लवकरच अटक केली जाईल. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात ढाबा मालक सनव्वर, त्याची पत्नी आणि इतर पाच जणांना आरोपी बनवण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.