Musk – Trump Feud : एलॉन मस्क – डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाद संपला? मस्क यांचा माफीनामा; ट्रम्प यांची माफी

Musk - Trump Feud : मस्क यांनी ट्रम्प यांची जाहीर माफी मागितली आहे.

79
Musk - Trump Feud : एलॉन मस्क - डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाद संपला? मस्क यांचा माफीनामा; ट्रम्प यांची माफी
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क यांनी आपल्यातील बेबनाव पूर्णपणे संपवल्याचे संकेत आहेत. अमेरिकन वेळेनुसार सोमवारी रात्री मस्क यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलणी केली. आणि आपल्या काही सोशल मीडिया पोस्टचा पश्चात्ताप होत असल्याचं त्यांनी राष्ट्राध्यक्षांना सांगितलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे भारतीय वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरही ट्रम्प यांची माफी मागितली. त्यानंतर ताज्या बातमीनुसार, डोनाल्ड ट्रम्प (Musk – Trump Feud) यांनीही मस्क यांना माफ केल्याचं समजतंय. ‘आमच्या भांडणाबद्दल उद्योजक एलॉन मस्क यांनी जाहीरपणे माफी मागितली, हे चांगलं केलं,’ असं ट्विट ट्रम्प यांनी आता केलं आहे. ‘ट्रम्प यांच्या विरोधात केलेली काही विधानं चुकीची होती. मी सीमा ओलांडायला नको होती,’ असं मस्क यांनी पूर्वी म्हटलं होतं. ट्रम्प यांनी या वादावर न्यूयॉर्क पोस्ट या वृत्तपत्रालाही प्रतिक्रिया दिली आहे. ‘जे घडलं ते चांगलंच झालं,’ असं ते म्हणाले. तर व्हाईट हाऊसच्या मीडिया प्रवक्त्या कॅरोलाईन लिव्हिट यांनी सरकार आणि मस्क यांच्या कंपनीतील कुठलाही करार मागे घेतला जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. (Musk – Trump Feud)

(हेही वाचा – Shailaja Pujari : राष्ट्रकुल स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक; मात्र ‘ही’ एक चूक पडली महागात)

ट्रम्प यांच्याशी संबंध बिघडल्याच्या बातमीनंतर मस्क यांच्या कंपन्यांचे शेअर बुधवारी गडगडले होते. पण, भांडण मिटल्याच्या बातमीनंतर ते दिवसभरात पुन्हा एका टक्क्याने चढले. ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलण्यापूर्वी एलॉन मस्क उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स आणि चीफ ऑफ स्टाफ सुझी वाईल्स यांच्याशी बोलले होते. ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेपासून एलॉन मस्क त्यांच्याबरोबर होते. पण, अलीकडेच काँग्रेसमध्ये सादर झालेल्या ‘बिग ब्युटिफूल बिल’ नंतर मस्क यांचा ट्रम्प यांना विरोध सुरू झाला. हे विधेयक ट्रम्प (Musk – Trump Feud) यांचं महत्त्वाकांक्षी विधेयक आहे. यात नागरिकांवर लागू होणाऱ्या सामाजिक सुरक्षा करात मोठी सूट प्रस्तावित आहे. तसंच अतिरिक्त केलेल्या कामाचा मिळणार मोबदला, टिप या गोष्टी आता करमुक्त असतील. सरकारकडून नागरिकांना मिळणाऱ्या मेडिकेड म्हणजेच वैद्यकीय मदतीच्या विधेयकात खूप मोठे बदल प्रस्तावित आहेत. या कायद्याअंतर्गत लोकांना मिळणारी वैद्यकीय मदत नवीन बदलांमुळे कमी होणार आहे. राज्य आणि स्थानिक प्रशासनाला मिळणारे कर म्हणजेच सॉल्ट करही आता कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यांचा महसूल कमी होऊन केंद्रसरकारचा वाढणार आहे. (Musk – Trump Feud)

(हेही वाचा – Muhammad Yunus याचा भारताशी चकमकी घडवण्याचा प्रयत्न त्यांच्याच आर्मी जनरल ने हाणून पाडला)

१,००० पानाचं हे विधेयक काँग्रेसमध्ये संमत होऊन आता सिनेटमध्ये मांडलं जाणार आहे. या विधेयकातील काही गोष्टींना मस्क यांनी विरोध केला होता. ‘विधेयक एकतर मोठं असू शकतं किंवा सुंदर असू शकतं. ते एकाच वेळी मोठं आणि सुंदर असू शकत नाही,’ असं ते बिग ब्युटिफूल बिल या नावावरून म्हणाले होते. ट्रम्प (Musk – Trump Feud) यांनी प्रशासनावरील भार हलका करण्यासाठी डॉज म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी या नावाने नवीन विभाग तयार केला. या विभागात एलॉन मस्क काम करत होते. पण, या विधेयकाला विरोध करत गेल्या शनिवारी ते यातून बाहेर पडले. डॉज विभागासाठीची तरतूद कमी केल्याचा राग यासाठी कारणीभूत होता. डॉजचं काम पुढे चालूच राहील असं मात्र ते म्हणाले होते. (Musk – Trump Feud)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.