Nagpur Municipal Corporation: पीओपी गणपतीच्या गोदामावर मनपाची कारवाई, 500 मूर्ती जप्त

31
Nagpur Municipal Corporation: पीओपी गणपतीच्या गोदामावर मनपाची कारवाई, 500 मूर्ती जप्त
Nagpur Municipal Corporation: पीओपी गणपतीच्या गोदामावर मनपाची कारवाई, 500 मूर्ती जप्त

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पीओपी मूर्तीची विक्री आणि साठ्यावर नागपूर महापालिकेने बंदी घातली आहे. गणेशोत्सव आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीओपीच्या मूर्तीचा साठा केला असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

येथील शाहू मूर्ती भंडारच्या प्रशांत शाहू यांनी मोठ्या प्रमाणात मूर्ती गोदामात ठेवल्या होत्या. या गोदामावर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि उपद्रव शोध पथकाने दुपारी 1 वाजता गोदामावर छापा मारला. यावेळी पथकासोबत पारंपरिक मूर्तीकार आणि हस्तकला कारागीर संघाचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

(हेही वाचा – Asia Cup 2023 IND vs PAK : भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानची गोलंदाजी फोडली; ३५६ धावा केल्या )

यावेळी गोदामातील पीओपीच्या मूर्ती पालिकेच्या उपद्रव शोध पथकाने जप्त केल्या. जवळपास 500पेक्षा जास्त मूर्ती या गोदामात होत्या. या कारवाईवेळी गोदाम मालकाने पथकासोबत वादविवाद घातल्याने पोलीसही कारवाईच्या स्थळी पोहोचले. मनपाने जप्त केलेल्या मूर्ती किमान 5 लाख रुपयांच्या असल्याची माहिती पालिकेकडून मिळाली आहे. या कारवाईमुळे पीओपीच्या मूर्ती विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.