Iqbal Singh Chahal : महापालिका आयुक्त चहल म्हणतात, पाणी तुंबले नाही नालेसफाई झाल्याचा हाच पुरावा

208
Iqbal Singh Chahal : महापालिका आयुक्त चहल म्हणतात, पाणी तुंबले नाही नालेसफाई झाल्याचा पुरावा
Iqbal Singh Chahal : महापालिका आयुक्त चहल म्हणतात, पाणी तुंबले नाही नालेसफाई झाल्याचा पुरावा

मुंबईकर नागरिकांची जोरदार पावसातही कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी महानगरपालिका प्रशासनाद्वारे पूर्ण तयारीनिशी उपाययोजना करण्यात आली असल्याचा दावा महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला. मुंबईत शनिवारी झालेल्या अवघ्या काही तासातच अधिकचा पाऊस झाला आहे. त्या तुलनेत पाणी निचरा वेगाने झाला. हा कालावधी लक्षात घेतला तर नाल्यातून गाळ काढण्याची कामे योग्य पद्धतीने झाल्याचा हा पुरावा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत आणि पाण्याचा जलद निचरा होत राहील, सर्वांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही या पाहणी दौऱ्यात चहल यांनी केले.

मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पाणी निचरा करण्यासह इतर कामकाजाची पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील विविध ठिकाणी भेट दिली. मुंबईत शनिवार २४ जून आणि २८ जून २०२३ देखील कमी वेळेत अधिक पाऊस झाला. पण सखल भागांमध्ये देखील तुलनेत पाण्याचा निचरा अत्यंत जलदगतीने झाला असा दावा महापालिका आयुक्तांनी केला आहे. सागरी सेतूलगत खान अब्दुल गफार खान मार्ग, वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदी परिसर, धारावी टी जंक्शन, शीव येथील गांधी मार्केट (सायन), हिंदमाता परिसर आणि सेंट झेव्हियर्स मैदान येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळी उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (परिमंडळ ३). रणजित ढाकणे, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्र‌शांत सपकाळे, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे, एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

(हेही वाचा – Independent Workers Welfare Corporation : असंघटीत कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण महामंडळाची स्थापना)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार यंदा पावसाळी उपाययोजनांमध्ये नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात खोलीकरण करण्यात आले आहे. दरवर्षी होणाऱ्या गाळ काढण्याच्या कामांच्या तुलनेत यंदा अधिक गाळ काढून कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जोरदार पावसातही मिठी नदी परिसरातील झोपडपट्टी परिसरात पावसाचे पाणी शिरले नाही, हा त्याचाच पुरावा आहे. मुंबईतील पाणी साचणाऱ्या सखल भागात पाणी निचरा करण्यासाठी सुमारे ४८० पंप ऑपरेटरची यंत्रणा सज्ज आहे. पाण्याचा निचरा जलदगतीने व्हावा यासाठी यंत्रणेकडे नियमित समन्वय साधण्यात येत आहे. मुंबईत शनिवारी आणि झालेला अवघ्या काही तासातच अधिकचा पाऊस झाला आहे. त्या तुलनेत पाणी निचरा वेगाने झाला. हा कालावधी लक्षात घेतला तर नाल्यातून गाळ काढण्याची कामे योग्य पद्धतीने झाल्याचा हा पुरावा आहे. पावसाळी कामांसाठी महानगरपालिकेने योग्यपणे नियोजन केले आहे. मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिकेच्या यंत्रणेवर वि‌श्वास ठेवावा, असे आवाहन देखील आयुक्तांनी केले

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.