Mumbai Road Side Trees : मुंबईतील ३३० झाडांची मुळे झाली मोकळी, तब्बल १६७३ झाडांना केले वेदनामुक्त

935
Mumbai Road Side Trees : मुंबईतील ३३० झाडांची मुळे झाली मोकळी, तब्बल १६७३ झाडांना केले वेदनामुक्त
Mumbai Road Side Trees : मुंबईतील ३३० झाडांची मुळे झाली मोकळी, तब्बल १६७३ झाडांना केले वेदनामुक्त
  • मुंबई, विशेष प्रतिनिधी

मुंबईतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेचे ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ सुरू झाले आहे. मुंबईतील वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याअंतर्गत झाडांवर खोचलेले फलक, खिळे, केबल्स काढण्यात येत असून मागील तीन दिवसांमध्ये ३३० झाडांच्या मुळांवर असलेले सिमेंट काँक्रिटचा थर काढून टाकण्यात आला आहे, तर १६७३ खिळे आणि केबल्स तसेच ४५२ फलक काढण्यात आले आहेत. येत्या ३० एप्रिल २०२५ पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. या अभियानात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मुंबईतील स्वयंसेवी संस्था (NGO) सहभागी झाल्या आहेत. (Mumbai Road Side Trees)

(हेही वाचा – Swimming Pool : मुंबईकरांना, महापालिका पोहायला शिकवणार, या दोन जलतरण तलावांमध्ये या दिवसापासून देणार प्रशिक्षण)

WhatsApp Image 2025 04 18 at 5.13.04 PM

मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) हे अभियान हाती घेतले आहे. मुंबईतील वृक्षांचे आरोग्य सुधारावे, त्यांची वाढ व्हावी, जोपासना व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani), अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी (Dr. Amit Saini) यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त (उद्याने) अजीत आंबी (Ajit Ambi) यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. (Mumbai Road Side Trees)

महानगरपालिकेने सन २०२२ मध्ये सर्वप्रथम हे अभियान हाती घेतले होते. पहिल्या टप्प्यात हे अभियान अत्यंत यशस्वी झाले होते. त्यामुळे आता अभियानाचा पुढचा टप्पा हाती घेण्यात आला आहे. या अभियानात वृक्षांवरील खिळे, जाहिरातीचे बॅनर / पोस्टर्स, वायर्सचे जंजाळ, वृक्षांच्या मुळाशी झालेले काँक्रिटीकरण काढून टाकण्यात येत आहे. तसेच झाडांभोवतीचे सिमेंट काढल्यानंतर तेथे लाल मातीचा थर दिला जात आहे. त्यानंतर झाडांना पुरेसे पाणी टाकले जात आहे.

(हेही वाचा – इटलीच्या पंतप्रधानांनी घेतली Donald Trump यांची भेट ; जॉर्जीया मेलोनी यांचे केले कौतुक)

वृक्ष मित्र ग्रुप आणि डायमंड गार्डन ग्रुप, पाटकर महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग तसेच अनादी आनंद ज्येष्ठ नागरी संस्था आदींसह महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थाही (NGO) सहभागी होवून याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड ऑफिस) रस्त्यालगतच्या वृक्षांवर नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी (Jitendra Pardeshi) यांनी दिली आहे. (Mumbai Road Side Trees)

मागील १५ ते १७ एप्रिल २०२५ दरम्यानची कारवाई

झाडांच्या मुळांवरील काढून टाकण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाचा थर : ३३० झाडे

खिळे आणि काढून टाकण्यात आलेल्या केबल्सची संख्या : १६७३ झाडे

झाडांवर काढून टाकण्यात आलेल्या खिळ्यांचे वजन : १४.६४ किलो

फलक काढून टाकण्यात आलेल्या झाडांची संख्या : ४५२ झाडे

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.