Mumbai Rain Update : मुंबईसाठी ऑरेज अलर्ट जारी; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो ? वाचा

71
Mumbai Rain Update : मुंबईसाठी ऑरेज अलर्ट जारी; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो ? वाचा
Mumbai Rain Update : राज्यात मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आला आहे. मान्सूच्या पहिल्याच पावसात मुंबईची मात्र दाणादाण उडाली. पुढचे काही दिवस जोददार पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाच काही तासांच्या विश्रांतीनंतर मुंबई तसेच उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कांदिवली, ठाणे, बोरीवली, दहिसर, लोअर परेल यासारख्या भागात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे. तर मुंबईसह आसपासच्या भागात हवामान विभागाने ऑरेज अलर्ट जारी केला आहे. (Mumbai Rain Update )
(हेही वाचा – IPL 2025, Rishabh Pa nt : हंगामातील शेवटच्या सामन्यात ऋषभ पंतची बॅट तळपली, शतकानंतर सॉमरसॉल्ट)

मुंबईत विविध भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसाची प्रमुख ठिकाणे
  • नरीमन पॉईंट: सकाळी ६ ते ७ दरम्यान ४० मिमी पावसाची नोंद.
  • ग्रँट रोड: ३६ मिमी पाऊस.
  • कुलाबा: ३१ मिमी पाऊस.
  • भायखळा: २१ मिमी पाऊस.
याशिवाय, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी सुरू आहेत.

(हेही वाचा – Bhigwan Bird Sanctuary : फ्लेमिंगो पक्षी पाहायचे असतील तर भिगवण पक्षी अभयारण्याला या महिन्यात भेट द्या)

बरसणारा मान्सून नव्हे तर वळवाचा पाऊस? हवामान तज्ज्ञांचा दावा
मुंबई – पुणेसह राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला असला तरी हा मान्सूनचा पाऊस नसून वळवाचा पाऊस (Pre Monsoon) असल्याचा दावा हवामान तज्ज्ञांनी केला आहे. मोसमी वारे मुंबई पर्यंत दाखल झाले आहेत. मात्र अद्यापही राज्यातील काही भागात मान्सूनचा पाऊस पडला नसल्याचा हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. मान्सूनपूर्व तीव्र वादळी ढगांमुळे राज्यातील काही भागात पाऊस झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
हवामानाचा अंदाज
  • मुंबई: पुढील दोन दिवसांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता.
  • पुणे: ढगाळ वातावरण; दुपारी हलक्या सरींची शक्यता.
  • नाशिक: ढगाळ वातावरण; दुपारी हलक्या सरींची शक्यता.
  • नागपूर: उष्ण आणि दमट वातावरण; दुपारी काही ठिकाणी पावसाच्या सरी.
  • औरंगाबाद: ढगाळ वातावरण; दुपारी काही ठिकाणी पावसाच्या सरी.
  • कोल्हापूर: ढगाळ वातावरण; काही ठिकाणी पावसाच्या सरी.
  • सोलापूर: ढगाळ वातावरण; सकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी.
  • अमरावती: ढगाळ वातावरण; दुपारी काही ठिकाणी पावसाच्या सरी.
  • नांदेड: ढगाळ वातावरण; दुपारी काही ठिकाणी पावसाच्या सरी.
    लातूर: ढगाळ वातावरण; दुपारी काही ठिकाणी पावसाच्या सरी.
मान्सून मध्ये वाऱ्याची दिशा ही दक्षिण – पश्चिम असते. मात्र मुंबई आणि पुण्यातील सध्या वाऱ्याची दिशाही उत्तर- पश्चिम आहे. असा दावा देखील तज्ज्ञांनी केला आहे. 28 मे नंतर महाराष्ट्रासह अनेक भागात मोठे बदल दिसून येतील. त्यानंतर 30 मे पासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात कोरडे वातावरण असणार आहे. मान्सूनचा मोठा पाऊस 5 जून पर्यंत महाराष्ट्रात पडणार नाही. असा दावा देखील हवामान तज्ज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी केला आहे. कोरडी हवा ही मान्सूनच्या वाऱ्यांना ब्रेक लावणार आणि तो मान्सूनचा नॉर्मल टाईम टेबल असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – FundKaveriEngine : सोशल मीडियावर ट्रेंड होणारं ‘कावेरी’ नेमकं आहे तरी काय?, वाचा सविस्तर)

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.