-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
हिंदमाता परिसरात सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसात पाणी तुंबून त्याचा निचरा न झाल्याने महापालिका प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. परंतु याठिकाणी साचल्या जाणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात येणारे पंप नसल्यामुळे या पाण्याचा निचरा जलदगतीने होऊ शकला नाही. पण याठिकाणी बसवण्यात येणाऱ्या पंपांकरता निविदा वेळेत काढूनही याला वेळीच मंजुरी न मिळाल्याने हे पंप बसवण्यास विलंब झाला आहे. या पंपाच्या निविदेबाबत शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) आमदारांनीच पत्रे दिल्याने याला विलंब झाल्याची कारणे पुढे येत असून याठिकाणी पाणी तुंबले म्हणून बोंबा ठोकत आहेत, त्यांच्याच आमदारांनी ही निविदा वेळेत मंजूर होण्यास अडथळा निर्माण केल्याने हिंदमाताच्या ठिकाणी पाणी तुंबले जावे ही मातोश्रीची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. (Mumbai Rain)
मुंबई महापालिकेच्यावतीने सर्व प्रकारच्या उपाययोजना करूनही दादर पूर्व हिंदमाता परिसरात पाणी तुंबून परळ, लालबाग, काळाचौंकी तसेच भायखळा परिसरात पाणी तुंबण्याचा प्रकार घडून येथील रस्ता वाहतूक विस्कळीत झाली आहे. हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) वतीने महापालिका प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली. तसेच प्रशासकांच्या कामकाजावर शंका उपस्थित करताना सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मात्र, याठिकाणी तब्बल १५ पंप बसवले जातात आणि या पंपाच्या माध्यमातून सेंट झेवियर्स आणि प्रमोद महाजन उद्यानात टाकी बनवून यात हे पाणी पंपिंग केले जाते. परंतु टाकीमध्ये पाणी पंपिंग करण्यासाठी पंप कार्यान्वित नसल्याने याठिकाण पाणी तुंबल्याचा आरोप केला जात होता. (Mumbai Rain)
(हेही वाचा – महिला आयोगाच्या अध्यक्षांकडूनच जिवाला धोका? Sangeeta Bhalerao यांची खळबळजनक तक्रार)
मात्र, हिंदमाता आणि मडके बुवा चौक याठिकाणी पंप बसवण्यासाठी सन २०२१ त सन २०२४ या कालावधीकरता ३९ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. हे कंत्राट ऑक्टोबर २०२४ मध्ये संपुष्टात आले. हे कंत्राट म्हाळसा कंस्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात कंत्राट संपुष्टात आल्यानंतर पर्जन्य जलवाहिनी विभागाच्यावतीने पुढील पाच वर्षांकरता कंत्राट देण्यासाठी निविदा प्रकिया राबवण्यास सुरुवात केली. परंतु निविदा प्रक्रियेत नवीन कंपनी या कामासाठी पात्र ठरल्यानंतर शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) काही आमदारांनी महापालिकेला पत्र लिहून या कंपनीकडे अनुभव नाही तर त्यांना काम कसे दिले जाते असा सवाल उपस्थित केला. विशेष म्हणजे तब्बल तीन आमदारांनी या कंत्राट कामाला आक्षेप नोंदवणारी पत्रे दिली. त्यामुळे महापालिकेला प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया अंतिम होऊन याला मंजूरी देण्यास विलंब झाला. त्यामुळे अखेर १४ मे रोजी नवीन कंपनीला कार्यादेश देऊन एक जून पर्यंत पंप कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले होते. (Mumbai Rain)
त्यामुळे जर शिवसेना उबाठाच्या आमदारांनी या निविदेतील निवडीला आक्षेप नोंदवले नसते तर ही याला आधीच मंजुरी मिळून पंप याठिकाणी बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असती. त्यामुळे महापालिकेत सत्तेवर असताना याठिकाणी पाणी तुंबले जाऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेना उबाठाकडून आता हिंदमाता परिसरात पाणी तुंबले जावे यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे या विरोधात पत्रे द्यायची आणि दुसरीकडे पाणी तुंबले म्हणून प्रशासन आणि सरकार विरोधात बोंबा ठोठायचा असा प्रकार सरु असल्याने शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) नेत्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. (Mumbai Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community