राज्यात पावसाने जोरदार हजेरी (Mumbai Rain) लावली असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई परिसर मुसळधार सरींनी झोडपले जात आहेत. पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. (Mumbai Rain)
हेही वाचा-Monsoon Update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस पुन्हा दडी मारणार ? कृषी विभागाचं आवाहन काय ?
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विशेषतः ठाणे जिल्हा आणि इतर जास्त पावसाचा मारा असलेल्या भागांचा आढावा घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी मदत आणि बचाव कार्य तत्परतेने पार पाडण्याचे निर्देश दिले. “प्रशासन सज्ज असावे, मदत कार्यात कोणतीही ढिलाई नको!” अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. (Mumbai Rain)
पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, कुठेही जीवितहानी वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. रस्ते, पूल, विजेच्या तारा, मोडकळीस आलेल्या इमारती यावर विशेष लक्ष केंद्रित करावे असेही ते म्हणाले. (Mumbai Rain)
मुंबई आणि ठाणे परिसरात रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. (Mumbai Rain)
“हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करा, अनावश्यक प्रवास टाळा.
प्रशासन सज्ज आहे, पण नागरिकांनीही खबरदारी घ्यावी!” असे आवाहनही शिंदे यांनी केले.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर असल्याने या भागांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबवत असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. (Mumbai Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community