
मुंबईत अवकाळी पावसानं (Mumbai Rain) हजेरी लावली असून शहरातील अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाच्या जलदगती मार्गावरील रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकलसेवा धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Mumbai Rain)
हेही वाचा-Mumbai Rain : पावसाची दणदणीत हजेरी! राज्यभर मुसळधार सरींचा मारा
दादरच्या हिंदमाता परिसरातही नेहमीप्रमाणे पाणी तुंबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. (Mumbai Rain)
हेही वाचा- Monsoon Update : मुसळधार पावसाने मुंबई लोकल मंदावली ; वाचा सविस्तर माहिती …
मुंबईत अचानक झालेल्या या पावसामुळे रेल्वे प्रशासन व महापालिका यंत्रणा अलर्टवर आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Mumbai Rain)
हवामान विभागाने पुढील काही तासांत मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai Rain)
मुंबईतील मस्जिद बंदर परिसर पाण्याखाली, रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुक मंदावली. पहिल्याच पावसात नागरिकांचे मोठे नुकसान. #HindusthanPostMarathi #MumbaiRains #RainUpdate #HeavyRain #RedAlert
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 26, 2025
हेही पहा-
Join Our WhatsApp Community