Mumbai Rain : मुसळधार पावसाने जनजीवन कोलमडले

111
Mumbai Rain : मुसळधार पावसाने जनजीवन कोलमडले
  • प्रतिनिधी

राज्यभरात वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना, जनजीवन ठप्प झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना ‘अलर्ट मोड’ वर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांशी थेट संपर्क साधला आहे. (Mumbai Rain)

(हेही वाचा – Veer Savarkar :   डॉ. विजय जोग यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्काराने गौरव; म्हणाले, “मी मार्क्सवादी तरी सावरकरप्रेमी, कारण…”)

अतिवृष्टीची ठिकाणं आणि कारवाईचा आढावा :
  • दौंड – 117 मिमी पाऊस
  • बारामती – 104.75 मिमी | २५ घरांचे अंशतः नुकसान, ७ जणांची सुटका, ८० कुटुंबे स्थलांतरित
  • इंदापूर – 63.25 मिमी | २ नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढले
  • फलटण – 163.5 मिमी | NDRF तैनात, ३० नागरिकांची सुटका, निवास व भोजनाची व्यवस्था
  • सोलापूर – 67.75 मिमी | माळशिरस तालुक्यात ६ नागरिकांची सुटका
  • पंढरपूर – भीमा नदी पात्रात ३ जण अडकले, बचावकार्य सुरू (Mumbai Rain)

(हेही वाचा – Mahim Building Collapse: मुंबईत जोरदार पाऊस; माहीममध्ये इमारतीचा भाग कोसळला)

मुंबईत पावसाने वाहतुकीस अडथळा :
  • २४ तासांत 135.4 मिमी पावसाची नोंद
  • ६ ठिकाणी पाणी साचले, १८ शॉर्टसर्किट, ५ इमारतींच्या भिंती कोसळल्या
  • मुंबई महापालिका, अग्निशमन दल, पोलिस आणि एनडीआरएफच्या ५ टीम सतर्क
  • कोणतीही जीवितहानी नाही (Mumbai Rain)

(हेही वाचा – Ashish Shelar यांचा शिवसेना उबाठावर घणाघात; म्हणाले, ३ लाख कोटींचा लुटीचा बाजार मांडला…)

रायगडमध्ये विजेचा फटका आणि रस्ता बंद :
  • विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
  • महाड ते रायगड किल्ला मार्ग बंद

राज्य सरकारने मोबाईल सेवा, पूरबचाव, निवास, भोजन यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनात तातडीची पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वरून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करत म्हटले, “सरकार तुमच्यासोबत आहे, मदतीसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.”

हवामान खात्याचा इशारा : पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा धोका कायम. राज्यात नैसर्गिक आपत्तीने घातलेला कहर रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असून, नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. (Mumbai Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.