
मुंबईत (Mumbai Rain) आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. वादळी वारे ताशी 40-50 किमी वेगाने वाहण्याची शक्यता आहे, विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनाही अपेक्षित आहे. अरबी समुद्रात 21-22 मेपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र 24 मेपर्यंत तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील आणि पावसाचा जोर वाढू शकतो. (Mumbai Rain)
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकला मान्सूनने घेरलं असून आज(25 मे) तिन्ही भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Mumbai Rain)
हेही वाचा- Mumbai – Pune Express Way वर ८ वाहनांचा विचित्र अपघात
मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. तर आज देखील राज्यातील बहुतांश भागात पावसाचे ढग कायम असल्याचे बघायला मिळत आहे. आज रविवारी, मुंबई आणि मुंबई उपनगरासह ठाण्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. मुंबईत आज पहाटेपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. दक्षिण मुंबई आणि उपनगर परिसरात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. ठाण्यातही पाऊस सुरु झाला आहे. (Mumbai Rain)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community