महाराष्ट्रात मान्सून (Mumbai Monsoon) १२ दिवस आधी दाखल झाला आहे. अनेक दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडत होता. राज्यात आतापर्यंत पावसाचे २२ बळी गेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुंबईत मान्सून (Mumbai Monsoon) दाखल झाल्याची माहिती अधिकृतरित्या भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या हवामानतज्ज्ञ शुभांगी भुते यांनी 26 आणि 27 मे रोजी अनुक्रमे 135 मिमी आणि 164 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात मुंबईत पाऊस कसा असेल याचा पूर्वअंदाज देखील त्यांनी वर्तवला. येत्या आठवड्यात मुंबईत पावसाची शक्यता नाही, असं त्या म्हणाल्या. (Mumbai Monsoon)
हा मान्सूनचा पाऊस नव्हता तर …
शुभांगी भुते म्हणाल्या, मुंबईत मान्सून (Mumbai Monsoon) स्थिरावला आहे, मान्सूमध्ये मुसळधार पाऊस होतो. 24,25 आणि 26 मे रोजी जोरदार पाऊस झाल्यातं त्या म्हणाल्या. त्यानंतर 26 आणि 27 मे रोजी मुंबईत अनुक्रमे 135 मिमी आणि 164 मिमी पावसाची नोंद झाली. 18 मे रोजी मुंबईत झालेला पाऊस हा मान्सूनचा पाऊस नव्हता तर तो चक्रीवादळामुळं निर्माण झालेल्या स्थितीमुळं झाला होता. (Mumbai Monsoon)
मुंबईत पावसाची शक्यता कमी
मान्सूनची सुरुवात विशिष्ट हवामानाच्या पॅटर्न नुसार होते. पॅटर्न आणि चक्रीवादळाच्या स्थितीमुळं मुंबईत मोठा पाऊस होऊ शकतो. तो पॅटर्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. येत्या आठवड्यात मुंबईत पावसाची शक्यता नाही. (Mumbai Monsoon)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community