Mumbai Local Trains : अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; लोकलमध्ये येणार ‘स्वयंचलित दरवाजे, पण दम घुटणार नाही!”

96
Mumbai Local Trains : अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय; लोकलमध्ये येणार 'स्वयंचलित दरवाजे, पण दम घुटणार नाही!"
  • प्रतिनिधी

मुंबईत सोमवारी घडलेल्या हृदयद्रावक लोकल अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) च्या तज्ज्ञांसोबत तातडीची बैठक घेतली. नॉन-एसी लोकल ट्रेन्समध्ये ‘ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग’ लागू करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय शोधण्याचा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. (Mumbai Local Trains)

(हेही वाचा – Mumbai Train Accident : गेल्या २० वर्षात रेल्वे अपघातात ५१ हजार ८०२ जणांनी प्राण गमावले)

प्रश्न : दरवाजे बंद झाले तर दम घुटेल? उत्तर : नवी डिझाईन तीन पावलं पुढे!

नॉन-एसी कोचमध्ये हवा खेळती नसल्याने स्वयंचलित दरवाजे बसवल्यास प्रवाशांचा दम घुटण्याची शक्यता निर्माण होते. ही अडचण लक्षात घेऊन, कोच डिझाइनमध्ये तातडीने तीन मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला गेला –

  • दरवाज्यांमध्ये ‘लूवर्स’ (हवादार पट्ट्या) बसवण्यात येणार आहेत, ज्यामुळे दरवाजे बंद असतानाही हवेचा प्रवाह सुरळीत राहील.
  • कोचच्या छतावर ‘व्हेंटिलेशन युनिट्स’ बसवण्यात येणार आहेत, जे बाहेरून ताजी हवा आत आणतील आणि गाडीच्या आतले तापमान आणि ऑक्सिजनची पातळी नियंत्रित ठेवतील.
  • प्रत्येक कोचमध्ये ‘वेस्टीब्यूल्स’ असणार आहेत, जेणेकरून प्रवासी एक कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये सहजपणे जाऊ शकतील. त्यामुळे गर्दीचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. (Mumbai Local Trains)

(हेही वाचा – Hindu Mahasabha आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार)

पहिली नवी ट्रेन कधी धावेल?

या नवनिर्मित डिझाईनवर आधारित पहिली ट्रेन नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार केली जाईल. आवश्यक चाचण्या आणि प्रमाणन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जानेवारी २०२६ पासून ती मुंबईच्या उपनगरीय सेवेत दाखल होणार आहे. (Mumbai Local Trains)

हे बदल कोणत्या योजनेंतर्गत?

हा उपक्रम सध्या सुरू असलेल्या २३८ एसी लोकल गाड्यांच्या निर्मितीच्या बाहेरचा स्वतंत्र प्रयत्न आहे. मुंबईकरांसाठी अधिक सुरक्षित आणि आधुनिक प्रवास देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सरकारचा हा निर्णय वेळेवरचा आणि अत्यंत आवश्यक आहे. लोकलमध्ये जीवाची भीती न बाळगता प्रवास करता यावा, हे आता केवळ स्वप्न नाही, तर धोरणात्मक कृतीच्या दिशेने एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. (Mumbai Local Trains)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.