मुंबई देशातील स्टार्टअप्ससाठीचा (Start Up) सर्वात मोठा हब बनत असून महाराष्ट्र आता भारताच्या इनोव्हेशन युगाचं नेतृत्त्व करत आहे, अशी प्रभावी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज केली. गोरेगाव (Goregaon) येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित ‘स्टार्टअप कॉन्क्लेव २०२५’ मध्ये ते बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र हे फिनटेक धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे. गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण तयार करून आम्ही स्टार्टअप्सच्या (Start Up) उत्कर्षाला गती दिली आहे. त्याचेच फलित म्हणजे देशातील २४ टक्के स्टार्टअप्स (Start Up) आता महाराष्ट्रात कार्यरत आहेत.”
(हेही वाचा – IPL 2025, RCB vs SRH : पावसाच्या शक्यतेमुळे बंगळुरू वि हैद्राबाद सामना लखनौला हलवला)
आकड्यांमधून उलगडतोय यशाचा मंत्र
- महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची संख्या: २६,६८६
- देशातील स्टार्टअप्समधील वाटा: २४%
- या वर्षी उभा राहिलेला निधी: ३.७ अब्ज डॉलर्स
- वाढ दर (वर्षभरात): १५४%
- महाराष्ट्रातील युनिकॉर्न्सची संख्या: २७
मुंबई (Mumbai) हे आता आर्थिक, तांत्रिक आणि डिजिटल क्रांतीचं केंद्रबिंदू बनत आहे. फिनटेक, ई-कॉमर्स, हेल्थटेक, एडटेक आणि डीप टेक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असून, नव्या संधींनी व्यापारी, संशोधक आणि उद्योजक यांचं एक भक्कम जाळं उभं केलं आहे.
(हेही वाचा – Cabinet Decision : राज्यात एक लाख कोटीच्या गुंतवणुकीची अपेक्षा; प्रलंबित ३२५ प्रस्तावांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी)
नव्या युगाचं स्वप्न – ‘इनोव्हेशन सिटी’
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आणखी एका महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करत सांगितलं की, नवी मुंबईत ३०० एकरांवरील ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याचं काम सुरू आहे. या शहरात विज्ञान, डेटा सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांतील स्टार्टअप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असणार आहे.
पुणे देखील माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात झपाट्याने पुढे जात असून, संपूर्ण महाराष्ट्रच ‘टेक-इकोसिस्टम’चा सुपर पॉवर हब होतो आहे.
भारताकडून जागतिक स्टार्टअप महासत्ता बनण्याची तयारी
भारत सध्या दीड लाखांहून अधिक स्टार्टअप्सच्या (Start Up) बळावर एक जागतिक स्टार्टअप महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे. “आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं आहे. स्टार्टअप्सच्या माध्यमातूनच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल,” असं उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी ठामपणे सांगितलं.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
उद्योग, विज्ञान आणि नवसंशोधन यांची त्रिसूत्री घेऊन महाराष्ट्र ठरत आहे नव्या भारताचं इनोव्हेशन इंजिन!
मुंबईच्या पायाभूत विकासातून भारताच्या स्टार्टअप क्रांतीला मिळतेय नवा वेग, नवी दिशा!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community