Mumbai Fire Brigade घेणार फायर ड्रोन

अग्निशमन, मॉनिटरींग व मुल्यांकनाकरता फायर ड्रोनची खरेदी केली जाणार आहे. तसेच बुडणाऱ्या व्यक्तींच्या बचाव कार्यासाठी ६ रोबोटिक लाईफसेव्हींगची खरेदी करण्यासह वेगवेगळ्या तीव्रतेच्या आगी व इमारती कोसळण्याच्या प्रसंगातील बचावाकरता सरावाकरता इमारतींमधील आगी व बदिस्त जागेवरील बचावासंदर्भातील प्रशिक्षण देणारी अत्याधुनिक सिम्युलेशन प्रणाली उभारण्यात येणार आहे.

964
Mumbai Fire Brigade घेणार फायर ड्रोन

मुंबई अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) इमारतीच्या तळघरातील तसेच दाट धुराच्या ठिकाणी आगीशी सामना करण्याकरता २ फायर रोबोट्सची खरेदी करण्यात येत असतानाच आता अग्निशमन दलाच्यावतीने (Mumbai Fire Brigade) फायर ड्रोनची खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय ३५ बॅटरी ऑपरेटेड स्मोक एक्जॉस्टर एँड ब्लोवर्सचीही खरेदी केली जाणार आहे. मुंबई अग्निशमन दलासाठी (Mumbai Fire Brigade) सन २०२४-२५ या वर्षांसाठी २३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अग्निशमन दलाची क्षमता व सुविधा अद्ययावत करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. (Mumbai Fire Brigade)

ज्यामुळे अग्निशमन, मॉनिटरींग व मुल्यांकनाकरता फायर ड्रोनची खरेदी केली जाणार आहे. तसेच बुडणाऱ्या व्यक्तींच्या बचाव कार्यासाठी ६ रोबोटिक लाईफ सेव्हींगची खरेदी करण्यासह वेगवेगळ्या तीव्रतेच्या आगी व इमारती कोसळण्याच्या प्रसंगातील बचावाकरता सरावाकरता इमारतींमधील आगी व बंदिस्त जागेवरील बचावासंदर्भातील प्रशिक्षण देणारी अत्याधुनिक सिम्युलेशन प्रणाली उभारण्यात येणार आहे. कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेज, कांजूरमार्ग पश्चिम एलबीएस मार्ग येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असून सांताक्रुझ पश्चिम जुहू तारा रोड, माहुर रोड चेंबूर व टिळक नगर येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे. (Mumbai Fire Brigade)

(हेही वाचा – Cabinet Meeting : धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)

या ठिकाणी केला जाऊ शकतो ड्रोनचा वापर

पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांतर्गत, मुंबई अग्निशमन दलाने शुन्य कार्बन उत्सर्जन करणारी, बॅटरीवरील चालणारी ६ इलेक्ट्रीक वाहने खरेदी केली आहेत. तसेच घर तथा इमारत कोसळण्याच्या घटनेसह भुकंप व इतर नैसर्गिक आपत्ती अशा आणीबाणीच्या परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तीच्या शोध व विमोचन कार्यासाठी १५ डिझास्टर डिप्लॉयमेंट किट खरेदी करून त्याचा वापर केला जात आहे. याशिवाय उत्तुंग इमारतींमधील अग्निशमन कार्यासाठी, अग्निशामक स्वत: सोबत वाहून नेऊ शकतात अशा ६५ कम्प्रेड एअर फोम सिस्टीची खरेदी करून त्या वापरात आणल्या आहेत. अग्निशमन दलाच्यावतीने (Mumbai Fire Brigade) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन दलात (Mumbai Fire Brigade) ड्रोन खरेदी करण्याचा विचार मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र, पुढील कालावधीत त्याची खरेदी करून त्याचा वापर करण्यात येणार आहे. (Mumbai Fire Brigade)

ड्रोन हा २० मजल्यापर्यंत जाऊ शकतो आणि या ड्रोनसोबत १०० किलो ग्रॅम पर्यंतच वजन वाहून नेले जाऊ शकते. तसेच या माध्यमातून २० मीटर दूरपर्यंत यातून पाणी फवारले जाऊ शकते. मागील वर्षी या ड्रोन संदर्भातील प्रात्यक्षिकाचे सादरीकरण झाले. या ड्रोनचा वापर उंच इमारतींसाठीच नाही तर जिथे दाटीवाटीने वस्ती वसली आहे आणि जिथे वाहने आणि ही फायर वॉटर इंजिनची व्यवस्था जात आहे, त्याठिकाणी या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो. यापूर्वी ड्रोनमध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या आणि अग्निशमन दलाच्यावतीने (Mumbai Fire Brigade) काही सुचना केल्या होत्या, त्यानुसार त्यात बदल केला करून सुविधा संदर्भात नव्याने ड्रोनची तंत्रज्ञानात बदल करून सादर करण्यास सांगितले होते, त्यानुसार नवीन बदलासह या ड्रोनचे सादरीकरण करण्यास सांगितले आहे. त्यानुसार आवश्यक बदलांसह या ड्रोनची खरेदी केली जाणार आहे. (Mumbai Fire Brigade)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.