-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
बोरिवली (पश्चिम) जोड मार्गावरील, एस.के. रिसॉर्ट जवळील एका खासगी अनधिकृत मंगल कार्यालयाचे बांधकाम शनिवार १० मे २०२५ रोजी तोडण्यात आले. सुमारे २० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर वसलेल्या या मंगल कार्यालयावर महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या कारवाई करण्यात आली. (BMC)
(हेही वाचा – BMC : दादर-धारावी नाल्यातील कचरा दररोज काढण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे आदेश)
बोरिवली पश्चिम जोड मार्गावर ‘के. डिव्हाईन लॉन्स अँड कन्व्हेन्शन’ हे मंगल कार्यालय सुमारे २० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर वसले आहे. मात्र ते अनधिकृत असल्याने आर मध्य विभागाने तोडक कार्यवाहीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. (BMC)
(हेही वाचा – Hawker : महापालिका आणि पोलिसांनी एकत्र येत मुंबईच्या ‘या’ रेल्वे स्थानकाचा परिसर केला फेरीवाला मुक्त)
हे बांधकाम हटवण्याची कारवाई शनिवारी १० मे २०२५ रोजी सकाळी ८.१५ वाजता सुरू करण्यात आली. यासाठी २ पोकलेन, ५ जेसीबी, १ अग्निशामक बंब तसेच १५ अभियंते, ५० कामगार व स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही तोडक कारवाई दुपारी ११.४५ वाजता पूर्ण करण्यात आली. उप आयुक्त (परिमंडळ-७) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही तोडक कारवाई करण्यात आली. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community