Mukesh Ambani : रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी एका दिवसांत किती पैसे मिळवतात ठाऊक आहे?

Mukesh Ambani : मुकेश यांचा नुकताच ६८ वा वाढदिवस साजरा केला आहे.

111
Mukesh Ambani : रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी एका दिवसांत किती पैसे मिळवतात ठाऊक आहे?
  • ऋजुता लुकतुके

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी अलीकडेच आपला ६८ वा वाढदिवस साजरा केला. भारत आणि आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी येमेन इथं झाला होता. वडील धीरुभाई अंबानी यांच्या पेट्रोकेमिकल व्यवसायात ते अगदी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर होते आणि वडिलांच्या निधनानंतर त्यांच्याकडून वारशाने मिळालेला उद्योग त्यांनी वाढवला आहे. भाऊ अनिल अंबानीबरोबरच्या मतभेदांनंतर तेव्हाच्या रिलायन्स समुहाचं विभाजन झालं आणि मुकेश यांच्याकडे पेट्रोकेमिकल्स आणि रिटेल उद्योग आला. तो उद्योग आता अंबानी यांनी वाढवला आहे. ६८ व्या वर्षी ते ९६.७ अब्ज अमेरिकन डॉलरचे धनी आहेत.

रिटेल आणि दूरसंचार तसंच वित्तीय सेवा सुरू झाल्यानंतर मागच्या १० वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. २०२० मध्ये त्यांची संपत्ती ३६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. तीच आता १०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा १८ वा क्रमांक लागतो. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अल्पावधीत सर्वाधिक ग्राहकांना आकर्षित करुन रिलायन्सच्या डिजिटल सेवा व्यवसाय जिओसाठी जागतिक विक्रम केला आहे. जगातील सर्वात मोठ्या ४जी ब्रॉडबँड वायरलेस नेटवर्कपैकी एक तयार करण्याचे श्रेय देखील त्यांना जाते. या माध्यमातून शिक्षणापासून आरोग्य सेवा, आर्थिक सेवा, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रात डिजिटल सेवेची मदत झाली.

(हेही वाचा – ख्रिस्ती धर्मगुरू Pope Francis यांचे निधन)

रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या जलद विस्तारामुळे या वाढीला चालना मिळाली आहे. आज, जिओचे देशभरात ४५० दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत. रिलायन्स रिटेलने देखील जगातील सर्वात मोठ्या रिटेल कंपन्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये रिलायन्सच्या भाग भांडवलात झालेल्या घसरणीमुळे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या एकूण संपत्तीत सुमारे २० अब्ज डॉलरची घट झाली आहे. नाहीतर या वर्षांत ते ११४ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचले होते.

असे रिलायन्स साम्राज्याचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची दैनिक मिळकत नेमकी किती असं कुतुहल सगळ्यांना असतं. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) दररोज १६३ कोटी रुपये कमावतात. दूरसंचार, पेट्रोकेमिकल, तेल, किरकोळ अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कंपन्यांमधून त्यांना हे उत्पन्न मिळतं. त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे की एखाद्या भारतीयाने वार्षिक ४ लाख रुपये कमावले तरी अंबानींइतकी संपत्ती मिळवण्यासाठी त्याला १.७४ कोटी वर्षं लागतील, जे अशक्य आहे. मुकेश अंबानी देखील अतिशय आलिशान जीवनशैली जगतात. ते मुंबईतील त्यांच्या आलिशान अँटिलिया घराची किंमतच १५,००० कोटी रुपये आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.