पुण्यात बर्निंग बस… शिवशाहीला शास्त्रीनगर चौकात भीषण आग; पहा संपूर्ण व्हिडिओ

120

पुणे शहरात शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पुण्यात एकाच दिवसात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे मंगळवारी सकाळी एका हॉटेलला पुण्यात आग लागली होती.

( हेही वाचा : एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ )

शिवशाही बसला भीषण आग 

शिवशाही बसला आग लागल्यावर बसमधील सर्व प्रवासी सुखरुप बाहेर पडले होते. भर रस्त्यामध्ये ही बस पेटल्याने एकच खळबळ उडाली आणि परिसरात गर्दी जमली. आगीमुळे बसचा पुढचा भाग संपूर्ण जळून खाक झाला आहे. पुण्यातील शास्त्रीनगर हा रहदारीचा परिसर आहे त्यामुळे येथे आग लागल्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती.

New Project 12

एम एम ०६ डी डब्ल्यू ०३१७ क्रमांकाची ही शिवशाही बस यवतमाळ-औरंगाबाद-पुणे या मार्गावर प्रवास करत होती. सकाळी येरवड्यातील शास्त्रीनगर येथील गलांडे रुग्णालयाजवळ ही बस आली असता या बसने अचानक पेट घेतला. शिवाजीनगर बस डेपोकडे जाताना ही दुर्घटना झाली. यातील सर्व प्रवासी खरडी येथे उतरले होते, परंतु अशाप्रकारे आग लागल्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

New Project 13

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.