MPSC Exam Timetable : एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात येणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

102
MPSC Exam Timetable : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
MPSC Exam Timetable : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २८ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात येणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहे. (MPSC Exam Timetable)

एमपीएससीच्या (MPSC) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाच्या परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे:
  • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ – १६ जुन २०२४
  • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२४ – २९ सप्टेंबर २०२४
  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ – १७ मार्च २०२४
  • दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२४ – २७ जुलै २०२४
  • सहायक मोटार वाहन निरिक्षक मुख्य परीक्षा २०२४ – २६ ऑक्टोबर २०२४
  • महाराष्ट्र गट–क सेवा मुख्य परीक्षा २०२४ – १७ नोव्हेंबर २०२४
  • अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२४ – ९ नोव्हेंबर २०२४
  • महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – १० नोव्हेंबर २०२४
  • महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परिक्षा २०२४ – १० नोव्हेंबर २०२४
  • महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा परीक्षा २०२४ – २३ नोव्हेंबर २०२४
  • महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – २३ नोव्हेंबर २०२४
  • महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ – २३ नाव्हेंबर २०२४
  • निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा २०२४ – १ डिसेंबर २०२४
  • महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ – २८,२९, ३० व ३१ डिसेंबर २०२४

(हेही वाचा – Uddhav Thackeray : चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; म्हणाल्या…)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वेळापत्रकासोबत नमूद केले आहे की, हे वेळापत्रक शासनाकडून संबंधित संवर्ग पदांसाठी विहित वेळेत मागणी पत्र प्राप्त होईल या गृहितकावर आधारित आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणी पत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यांमध्ये पदे विज्ञापित करणे आणि वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीचे अथवा परीक्षांच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणताही प्रकारचा बदल होऊ शकतो, बदल झाला तर आयोगाचे संकेतस्थळावर तसे प्रसिद्ध करण्यात येईल. (MPSC Exam Timetable)

अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्यावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळावेळी अद्यायावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. (MPSC Exam Timetable)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.