हुश्श! अखेर MPSC परीक्षांच्या तारखा जाहीर

88

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या MPSC परीक्षेची तारीख वारंवार पुढे ढकलली जात होती, आधीच वय वाढत असल्यामुळे परीक्षेसाठी ठरवलेली वयोमर्यादा उलटली जाऊ नये, अशी चिंता विद्यार्थ्यांना वाटत होती, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा घेण्यासाठी आग्रह धरला जात होता. अखेर एमपीएससी आयोगाने पुढील वर्षी 2022 ला होणाऱ्या सर्व अंदाजित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.

New Project 1 1

MPSC वर्षभरात वर्ग एक आणि दोन साठींच्या विविध संवर्गांसाठी साधारण 13 प्रकारच्या परीक्षा घेते. याचे अंदाजे वार्षिक वेळापत्रक UPSC च्या धर्तीवरच MPSC ने बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा जाहीर केले आहे. परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी होईल तर निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे.

(हेही वाचा दमानिया न्यायालयात गेल्या; भुजबळांच्या अडचणी वाढल्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.