Digital India उपक्रमांना चालना देण्यासाठी ८ दूरदर्शी संस्थांसोबत सामंजस्य करार

62

Digital India मिशनला पुढे नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) ने 25 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक्स निकेतन येथे आठ दूरदर्शी संस्थांसोबत सामंजस्य करार (MoU) केले. (Digital India)

(हेही वाचा – Hindu : बांगलादेशी घुसखोरांना हाकला, अन्यथा महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल; रणजित सावरकरांचा धोक्याचा इशारा)

ff81e712d1005606be722ac6fc123ffb 575111977

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव एस. कृष्णन यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्या. तसेच देशाच्या डिजिटल परिसंस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने एनआयईएलआयटीसाठी हा धोरणात्मक सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. असे विधान देखील केले. तसेच एनआयईएलआयटी ने ज्या संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यात सेमी-कंडक्टर लॅबोरेटरी (SCL), अरनेट इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी (NISE), अमृता विश्व विद्यापीठम, स्कायरुट एरोस्पेस, इन्स्टिट्यूट फॉर फायनान्शियल मॅनेजमेंट अँड रिसर्च (IFMR) आणि किंड्रील इंडिया यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Naxal Attack : तेलंगणातील बिजापूरमध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एक जवान जखमी  )

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिक्षण, कौशल्य, संशोधन आणि नवोन्मेष वाढविण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. या सहकार्याचे क्षेत्र संयुक्त संशोधन प्रकल्प, अभ्यासक्रम विकास, क्षमता बांधणी, प्रशिक्षण, कौशल्य विकास तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला सहयोग देण्यापर्यंत विस्तारलेले आहे. तसेच “एक मजबूत डिजिटल प्रणाली वृद्धिंगत करण्यासाठी तसेच भविष्यासाठी तयार असलेले कार्यबल विकसित करण्यासाठी शैक्षणिक, उद्योग आणि सरकारी संस्थांचे हे धोरणात्मक एकत्रीकरण आहे. डिजिटली सक्षम समाज आणि समृद्ध ज्ञान अर्थव्यवस्था घडवण्यासाठी यासारखे सहयोगी प्रयत्न आवश्यक आहेत” असे मत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव एस. कृष्णन यांनी अशा सहकार्यांचे महत्त्व अधोरेखित करताना व्यक्त केले.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था बद्दल अधिक माहिती
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया (MeitY) अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.

(हेही वाचा – Pakistan कडून अणुहल्ल्याची धमकी; भारताच्या ताकदीसमोर पाकड्यांची काय आहे औकात? स्वतः डोनाल्ड ट्रूम्प यांनीही शेअर केला व्हिडीओ )

तसेच 56 स्वतःची केंद्रे, 700 हून अधिक मान्यताप्राप्त प्रशिक्षण भागीदारांचे विशाल नेटवर्क आणि देशभरात 9,000 हून अधिक सुविधा केंद्रांसह, ही संस्था डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी (Digital economy) कुशल मनुष्यबळ विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अनौपचारिक क्षेत्रातील अभ्यासक्रम चालवणाऱ्या करणाऱ्या संस्थांना मान्यता देण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणून देखील राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था ओळखली जाते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.