Monsoon : अखेर ‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार

सध्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे शहरात पाऊस पडत असून हा मान्सूनपूर्व पाऊस आहे.

209
Monsoon : अखेर 'या' तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार

मुंबईमध्ये पावसाचे (Monsoon) आगमन केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच मुंबईच्या मान्सूनविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार कोकणात पोहोचलेल्या मान्सूनच्या वाऱ्याला मुंबईत पोहोचण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे शहरात पाऊस पडत असून हा मान्सूनपूर्व पाऊस आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपरजॉय’ (Biporjoy Cyclone) नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा भारतात प्रभाव दिसून येत आहे. ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. आता या वादळाने गुजरातकडे आपला मोर्चा वळवला आहे.

(हेही वाचा – रिल बनवताना विहीरीत पडून तरुणाचा मृत्यू)

मान्सूनविषयी सविस्तर माहिती देताना, हवामानशास्त्रज्ञ राजेश कपाडिया म्हणाले, “हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे, पश्चिम किनार्‍यावरील ग्रेडियंटला त्रास देत आहे, त्यामुळे दक्षिण कोकणच्या पलीकडे मान्सूनच्या (Monsoon) प्रगतीला विलंब होत आहे.” कपाडिया यांच्या म्हणण्यानुसार मान्सूनपूर्व सरी सुरू राहतील, मात्र बुधवारनंतर (१४ जून) त्यांची तीव्रता कमी होईल. तसेच मुंबईत १६ जूननंतर मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे.”

तसेच शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितल्या नुसार येत्या २४ तासांत मुंबई आणि महाराष्ट्रात मान्सूनपूर्व (Monsoon) पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु मुंबईत फार तीव्र पाऊस पडणार नाही. दरम्यान सोमवारी (१२ जून) आयएमडीच्या सांताक्रूझ वेधशाळेने मुंबई शहराचे कमाल तापमान ३६.८ डिग्री सेल्सियस इतके नोंदवले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.