Monsoon Update : हिमाचलसह उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार; अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा

हवामान विभागाने वर्तवला अंदाज

113
Monsoon Update : हिमाचलसह उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार; अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा

देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस (Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून, हिमाचल प्रदेशसह उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार सुरु आहे. या पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान पूर्व आणि मध्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

‘या’ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता

बिहारमधील पाटणा, गया, मोतिहारी, सुपौल, भागलपूर, दरभंगा इत्यादी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, लखनऊ आणि फैजाबाद जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश या राज्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आज (मंगळवार २२ ऑगस्ट) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Narendra Modi : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना, ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये विशेष सहभाग)

ऑगस्ट महिना गेल्या १०० वर्षातील सर्वात जास्त कोरडा

सध्या देशाच्या काही भागात पाऊस पडत असला तरी अनेक ठिकाणी पावसानं (Monsoon Update) दडी मारली आहे. त्यामुळं शेतकरी देखील चिंतेत आहेत. दरम्यान यावर्षीचा ऑगस्ट महिना गेल्या १०० वर्षातील सर्वात जास्त कोरडा महिना असल्याचे वृत्त इकोनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. याचा उन्हाळी शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.