बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या (Monsoon Update) प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यात काही भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (Monsoon Update)
हेही वाचा-Errol Musk : इलॉन मस्क यांच्या वडिलांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन! म्हणाले, “भारत हे एक …”
शेती जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. या तीन महिन्यातील पावसावरच शेतकीचा खटाटोप करावा लागतो. पूर्व मान्सून (Monsoon Update) , अवकाळीने मे महिन्याचा संदर्भ बदलून टाकला. पण मान्सूनची गती मंदावली. त्यामुळे जून महिन्यात उष्णतेचा, दमटपणाचा कहर दिसून येत आहे. हवामान खात्यानुसार, अजून काही दिवस अंगाची लाही लाही होईल. 16 वर्षानंतर मान्सून त्याच्या नियोजीत वेळेपूर्वी आला. पण आता त्याने थोडा ब्रेक घेतला आहे. तो 11-12 जून रोजी पु्न्हा सक्रिय होण्याची दाट अंदाज आहे. (Monsoon Update)
हेही वाचा- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हफ्ता मिळायला सुरूवात ; आदिती तटकरे यांची माहिती
पुणे वेधशाळेनुसार, हवामान खात्यानुसार, मान्सूनची (Monsoon Update) गती गेल्या काही दिवसात मंदावली आहे. यामध्ये 11-12 जून दरम्यान तेजी येईल. उर्वरीत भाग लवकरच मान्सूनमय होईल. पावसाचे आगमन होईल. शेतीच्या कामांना गती येईल. 24 मे रोजी मान्सून (Monsoon Update) केरळ मार्गाने राज्यात लवकर दाखल झाला होता. देशाच्या दक्षिण, उत्तर पश्चिम आणि पश्चिम भागात त्याने हजेरी लावली. पण त्याचा उत्साह टिकला नाही. त्याची गती मंदावली. हवामान खात्यानुसार, पश्चिम बंगालमधून मान्सूनला अजून बळ मिळेल. लवकरच देशभरात मान्सून सक्रिय होईल. (Monsoon Update)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community