Monsoon Session : २१ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार; ‘ऑपरेशन सिंदूर’चा मुद्दा संसदेत गाजणार?

Monsoon Session : येत्या २१ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन(Monsoon Session) सुरू होणार असून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवार, ०४ जून दिवशी घोषणा केली. संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन(Monsoon Session) २१ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

71

Monsoon Session : येत्या २१ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन(Monsoon Session) सुरू होणार असून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवार, ०४ जून दिवशी घोषणा केली. संसदेचे आगामी पावसाळी अधिवेशन(Monsoon Session) २१ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तीन महिन्यांच्या अवकाशानंतर आता २१ जुलैला सकाळी ११ वाजता पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे.(Monsoon Session)

(हेही वाचा Pakistani Spy : 3 वेळा पाकिस्तानात जाणाऱ्या पंजाबमधील आणखी एक युट्यूबरला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक ; ज्योती-दानिशशीही संबंध )

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलाने दि. ०७ मे रोजी सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर होणारे पहिलेच संसदीय अधिवेशन असणार आहे. या पावसाळी अधिवेशना(Monsoon Session)त ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली होती.

(हेही वाचा South Korea President Election : दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत ली जे-म्युंग विजयी ! मार्शल लॉ लागू करणाऱ्या येओल पक्षाला धक्का )

विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांकडून विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्राकडून संसदेचे पावसाळी अधिवेशन(Monsoon Session) बोलविण्यात आले आहे. एकंदरीत, या अधिवेशनात दहशतवाद, ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा होण्याची चिन्हे आहेत. विरोधकांकडून ऑपरेशन सिंदूरबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. त्यामुळे आगामी पावसाळी अधिवेशना(Monsoon Session)त कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा होणार, हे पाहणे औत्सुकतेचे असेल.

याआधीच विरोधकांकडून विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची आमची सामूहिक आणि तातडीने विनंती पुन्हा करतो, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह प्रमुख विरोधी नेत्यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रदेखील समोर आले होते.(Monsoon Session)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.