Monsoon 2024 नाल्याचा तळ दिसेपर्यंत गाळ काढा, मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश

551
Monsoon 2024 नाल्याचा तळ दिसेपर्यंत गाळ काढा, मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश
Monsoon 2024 नाल्याचा तळ दिसेपर्यंत गाळ काढा, मुख्यमंत्र्यांचे महापालिकेला निर्देश
विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबईत पावसाळ्यापूर्व (Monsoon 2024) नालेसफाईचे काम केले जात असल्याने यावरून भाजपाकडून आरोपांच्या फैरी महापालिका प्रशासनाकडून झाडल्या जात असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महापालिका मुख्यालयात दोन्ही पालकमंत्र्यांसमवेत महापालिका प्रशासनासह विविध प्राधिकरणाच्या प्रमुखांशी चर्चा केली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी, नाल्यातील गाळ आणि चिखल किती काढता याला महत्व नसून मुंबईत या नाल्यांमुळे पाणी तुंबले नाही असे काम करा. त्या गाळाची टक्केवारी न सांगता नाल्याचा तळ दिसेपर्यंत त्यातील गाळ काढा असेही निर्देश दिले आहे. त्यामुळे नाल्याच्या तळापर्यंतचा गाळ काढल्यास पाण्याचा प्रवाहही वाढेल आणि वाहून जाणाऱ्या पाण्याची क्षमताही वाढेल असेही त्यांनी नमुद केले. (Monsoon 2024)

मुंबईत मान्सून पूर्व कामे महापालिकेच्यावतीने केली जात असूना या मान्सूनपूर्व कामांमध्ये समन्वय राहून सर्वांनी एकत्रपणे आपापली जबाबदारी स्वीकारुन काम करावे या हेतून सर्व प्राधिकरणांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षात बैठक घेतली. या बैठकीला शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह महापालिका आयुक्त तसेच म्हाडा, रेल्वे, पोलिस, नेव्ही, एनडीआरएफ, एमएमआरडीए, आयएमडी आदींसह विविध प्राधिकरणांचे प्रमुख उपस्थित होते. पावसाळ्यात (Monsoon 2024) उद्ववणाऱ्या आपत्कालिन घटनांमुळे कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्त हानी होऊ नये यासाठी सर्व प्राधिकरणांमध्ये समन्वय राखण्यासाठी ही बैठक घेतली होती असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

(हेही वाचा – आप नेते दिल्लीत बसून पंजाबवर नियंत्रण ठेवतात; PM Narendra Modi यांचा हल्लाबोल)

नालेसफाईचे काम सध्या सुरु आहे, अजून १०० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केलेला नाही. मात्र हा गाळ नाल्याच्या तळापर्यंत काढणे आवश्यक असून नाल्यातील गाळ काठावर न ठेवता त्वरीत उचलून त्याची विल्हेवाट लावली जावी असे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (CM Eknath Shinde)

जिथे पाणी तुंबते तिथे २४ तास पंप बसवले जात असून १२ ते १३ ठिकाणी पावसाचे पाणी साठवण टाक्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच मॅनहोल्सबाबतचा चर्चा झाली असून महापालिकेच्यावतीने सुमारे १ लाख मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसवणार आहे, त्याची कार्यवाही सुरु आहे, तसेच पदपथावरील गटारांची झाकणे चोरी जावून अपघात होतो, त्यामुळे याबाबतही चर्चा करण्यात आली.

यंदाच्या पावसाळ्यासाठी (Monsoon 2024) पूर्णपणे महापालिकेची यंत्रणा संज्ज ठेवली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी एक टिम बनून काम केले तर कुठलीही दुर्घटना होणार नाही. मागील पावसाळ्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चांगल्याप्रकारचे काम केले होते, यंदाही ते प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडतील असा आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु कामात हयगय करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.