MNS Aandolan : मराठी पाट्या न लावल्याने मनसेने ठाण्यातील दुकानाच्या पाट्यांना फासलं काळ

85
MNS Aandolan : मराठी पाट्या न लावल्याने मनसेने ठाण्यातील दुकानाच्या पाट्यांना फासलं काळ
MNS Aandolan : मराठी पाट्या न लावल्याने मनसेने ठाण्यातील दुकानाच्या पाट्यांना फासलं काळ

दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी दिलेली 25 नोव्हेंबरची मुदतही संपली आहे. तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आक्रमक झाली आहे.ठाण्यात मराठी पती नसलेल्या शोरूमला मनसेने काळे फासले आहे. तर दुसरीकडे अंधेरी पश्चिमेकडील मनसे उपविभाग अध्यक्ष किशोर राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंधेरी मार्केट मधील दुकानदारांना मराठी भाषेत फलक लावण्याचे आदेश दिलेत. जर दुकानाचे नामफलक मराठीत (Marathi Board) झाले नाही तर मनसे स्टाईलने खळखट्याक करण्याचा इशाराच मनसेकडून देण्यात आला आहे.(MNS Aandolan)

ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरुमला काळे फसले आहे. मुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे . त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईननंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. (MNS Aandolan)

(हेही वाचा : Anniversary of 26/11 Terror: राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी वाहिली हुतात्मा जवानांना श्रद्धांजली)

मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे . त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यासंदर्भात मनसेचे आंदोलन केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.