-
प्रतिनिधी
मुंबईतील बहुचर्चित मिठी नदी घोटाळा प्रकरणात आता बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाच्या अडचणीत भर पडली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) डिनो मोरियाची ८ तास चौकशी केली असून, त्याचा भाऊ सॅन्टीनो मोरियालाही समन्स बजावण्यात आले आहेत. आठ तासांच्या चौकशी नंतर सायंकाळी ७ वाजता सोडण्यात आले. (Mithi River Scam)
या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असून, मोरियाच्या कुटुंबीयांच्या एका व्यावसायिक व्यवहाराचा संबंध या घोटाळ्याशी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच डिनो मोरियाची चौकशी केली. त्याचप्रमाणे, त्याचा भाऊ सॅन्टीनो मोरियालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. (Mithi River Scam)
(हेही वाचा – Mumbai Rain : मुंबईत पहिल्या पावसाने 107 वर्षांचा विक्रम मोडला !)
सूत्रांनुसार, मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामांमध्ये झालेल्या आर्थिक अपहारात काही खाजगी कंपन्यांना अवैध लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे. या कंपन्यांशी मोरियांच्या व्यावसायिक संबंधांची चौकशी करण्यात येत आहे. सध्या चौकशी प्राथमिक टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही नावं उघड होण्याची शक्यता आहे. (Mithi River Scam)
मिठी नदी घोटाळ्याने आधीच मुंबई महापालिकेसह विविध सरकारी यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना, आता बॉलिवूड सेलिब्रिटींचीही नावे समोर येत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनुसार, मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणात डिनो मोरिया आणि भाऊ सॅन्टिनो मोरियाहे दोघे मुख्य आरोपी केतन कदम यांच्यात अनेकवेळा फोनवर संभाषणे आढळल्यानंतर त्यांना समन्स बजावण्यात आले. मुख्य आरोपी कदम आणि मोरिया यांच्यात काय संभाषण झाले होते, तसेच या दोघांचा मिठी नदी गाळ घोटाळ्यामध्ये काय भूमिका आहे याबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Mithi River Scam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community