कामगारांच्या न्यायासाठी मंत्री थेट जनता दरबारात; Adv. Akash Fundkar यांनी ऐकल्या शेकडो तक्रारी, तातडीने तोडगा काढण्याची ग्वाही

64
कामगारांच्या न्यायासाठी मंत्री थेट जनता दरबारात; Adv. Akash Fundkar यांनी ऐकल्या शेकडो तक्रारी, तातडीने तोडगा काढण्याची ग्वाही
  • प्रतिनिधी

राज्याचे कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर (Adv. Akash Fundkar) यांनी बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या ‘जनता दरबारात’ थेट जनतेच्या आणि कामगार संघटनांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. राज्यभरातून आलेल्या कामगार संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या दरबारात सहभागी झाले. या संवादादरम्यान कामगारांनी मांडलेल्या समस्या समजून घेत तातडीने बैठका घेऊन निराकरण करण्याचे आश्वासन मंत्री फुंडकर यांनी दिले.

कामगार कायद्यांविषयीही सविस्तर चर्चा

या जनता दरबारात कामगार कायद्यांशी संबंधित अनेक विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. विविध क्षेत्रातील कामगारांसमोर उभ्या असलेल्या अडचणी, पेन्शन, वेतन, स्थायीकरण, कामगार सुरक्षा यांसारख्या विषयांवर मंत्री फुंडकर (Adv. Akash Fundkar) यांनी सजगपणे चर्चा केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश दिले.

(हेही वाचा – Operation Sindoor : पाकिस्तानला सातत्याने जशास तसे उत्तर देणे गरजेचे; लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारेंची स्पष्टोक्ती)

“सर्वसामान्य कामगारांसाठी मी नेहमीच उपलब्ध” – अ‍ॅड. फुंडकर

“सामान्य कामगारांपासून ते संघटनांच्या प्रतिनिधींना न्याय मिळवून देणे हे माझे प्राधान्य आहे. सरकारी यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे,” असे ठाम मत मंत्री फुंडकर (Adv. Akash Fundkar) यांनी व्यक्त केले. “जनता दरबार हा संवादाचा सेतू आहे आणि हा उपक्रम नियमितपणे राबवला जाईल,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नेतृत्वाच्या पाठिंब्याबद्दल आभार

या उपक्रमासाठी प्रेरणा आणि पाठींबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे कामगार मंत्री फुंडकर (Adv. Akash Fundkar) यांनी आभार मानले. जनता दरबाराचे आयोजन प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल भाजप प्रदेश समन्वयक सुधीर देऊळगावकर यांचेही त्यांनी विशेष उल्लेख करून अभिनंदन केले. राज्यातील कामगारांशी थेट संवाद साधणारा हा उपक्रम आता एक सशक्त व्यासपीठ ठरत असून, “कामगारांचा मंत्री केवळ कागदोपत्री न राहता, मैदानात उतरतो” हे या उपक्रमातून पुन्हा सिद्ध झाले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.