आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार; मंत्री Atul Save यांचा निर्धार

56
आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार; मंत्री Atul Save यांचा निर्धार
  • प्रतिनिधी

विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण व सर्वांगीण विकास साधणाऱ्या निवासी आश्रमशाळांमध्ये निर्माण झालेल्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी केले. मंत्रालयात स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

(हेही वाचा – India Pakistan War : भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला !)

या बैठकीला विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, वरिष्ठ अधिकारी व संस्थाचालक उपस्थित होते. मंत्री सावे (Atul Save) यांनी स्पष्ट केले की, प्रलंबित अनुदानाचे वितरण टप्प्याटप्प्याने लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच संचमान्यता आणि वेतन अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संचमान्यता प्रक्रियेनंतरच रिक्त पदांची यादी तयार करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. सीएमश्री योजनेत आश्रमशाळांचा समावेश करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, विद्यार्थ्यांना ‘आयुष्मान भारत’ कार्ड मिळावे आणि राज्य, विभाग व जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन व्हावे, यावर त्यांनी भर दिला.

(हेही वाचा – Operation Sindoor नंतर युक्रेनकडून भारत, पाकिस्तानला संयमाचे आवाहन)

या बैठकीत महिला अधीक्षकांची नियुक्ती, रिक्त पदांची भरती, सौरऊर्जेचा वापर, आश्रमशाळा संहिता आदी विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली. आश्रमशाळा ही केवळ शिक्षणाचे माध्यम नसून, समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीचा मजबूत पाया आहे, हे लक्षात घेऊन शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मंत्री सावे (Atul Save) यांनी यावेळी दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.