Mhada Lottery : म्हाडाच्या घरांसाठी दुसऱ्या दिवशी ४,२३६ अर्ज

ऑनलाईन लॉटरीच्या घरांच्या नोंदणीला सोमवारी २२ मे रोजी सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ६५५ जणांनी अर्ज भरले होते.

170

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्यावतीने मुंबईतील ४,०८३ घरांसाठी जाहीर झालेल्या लॉटरीमध्ये ऑनलाईन नोंदणीच्या दुसऱ्या दिवशी ४,२३६ अर्ज भरले गेले. तर १,७०० अर्जदारांनी या अर्जांसोबतची रक्कमही भरली आहे. या ऑनलाईन लॉटरीच्या घरांच्या नोंदणीला सोमवारी २२ मे रोजी सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ६५५ जणांनी अर्ज भरले होते, तर त्यातील २०८ जणांनी अर्जांची रक्कम भरली होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण ४,८९१ जणांनी ऑनलाईन अर्ज भरले असून त्यातील १,९०८ जणांनी अर्जांची रक्कम भरली आहे.

मुंबईतील पहाडी गोरेगाव, ऍंटॉप हिल, विक्रोळी कन्नमवारनगर, उन्नतनगर गोरेगाव, कांदिवली पश्चिम, जुहू, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, दादर पूर्व, भायखळा, शिवडी वडाळा, ताडदेव, लोअर परेल, पवई, चेंबूर, मालाड मालवणी, मुलुंड, मानखुर्द, चांदिवली आदी भागांमधील ४,०८३ घरांसाठी म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या लॉटरीच्या शुभारंभ झाला. सोमवारी दुपारी २ वाजता या ऑनलाईन घरांच्या लॉटरीतील नोंदणीचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्या दिवशी ६५५ जणांनी अर्ज भरले होते आणि त्यातील २०६ जणांनी त्यासोबतची रक्कमही भरली होती. तर मंगळवारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता ४,२३६ अर्जदारांनी अर्ज केले आहेत, तर त्यातील १,७०० अर्जदारांनी अनामत रक्कमही भरली आहे.

(हेही वाचा Siddhivinayak Temple : आदेश बांदेकरांना शिंदे-फडणवीसांकडून अभय; ‘सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट’ची चौकशी गुंडाळली?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.